शेलपिंपळगाव आरोग्य केंद्रांतर्गत ६ हजार ९२१ बालकांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:06 IST2021-02-05T05:06:07+5:302021-02-05T05:06:07+5:30
शेलपिंपळगाव येथे सरपंच विद्या मोहिते यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेला प्रारंभ करून ६५० बालकांना लसीकरण करण्यात आले. या मोहिमेला पंचायत ...

शेलपिंपळगाव आरोग्य केंद्रांतर्गत ६ हजार ९२१ बालकांना लसीकरण
शेलपिंपळगाव येथे सरपंच विद्या मोहिते यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेला प्रारंभ करून ६५० बालकांना लसीकरण करण्यात आले. या मोहिमेला पंचायत समिती सभापती भगवान पोखरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजीराजे मोहिते, युवा नेते मयूर मोहिते आदींनी भेट दिली. बहुळ उपकेंद्रात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, सरपंच गणेश वाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे १ हजार ९४ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.
पोलिओ लसीकरण मोहिमेत भोसे ८८३, काळूस ५२७, कोयाळी- भानोबा ३६८, वडगाव - घेनंद ४४७, केळगाव १२९३, सोळू १६७७, मरकळ ५०९ असे ६ हजार ९२१ बालकांना लसीकरण करण्यात आले. पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, ई. एम. पारधी, डी. आर. आढाव, एम. एस. चव्हाण, जे. बी. रणदिवे, गटप्रवर्तक सी. इंगळे, के. एस. गायकवाड आदींसह आशा वर्कर व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.
शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे बालकांना पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करताना सरपंच विद्या मोहिते. (छाया : भानुदास पऱ्हाड)