आंबवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात १९०८ नागरिकांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:24 IST2021-09-02T04:24:32+5:302021-09-02T04:24:32+5:30
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पुणे जिल्हा परिषदेने जानकीबाई बजाज फाऊंडेशनच्या सहकार्याने जिल्ह्यात महालसीकरण मोहीम राबवण्यात आली. त्यात भोर तालुक्यातील आंबवडे ...

आंबवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात १९०८ नागरिकांना लस
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पुणे जिल्हा परिषदेने जानकीबाई बजाज फाऊंडेशनच्या सहकार्याने जिल्ह्यात महालसीकरण मोहीम राबवण्यात आली. त्यात भोर तालुक्यातील आंबवडे आरोग्य केंद्राच्या मार्फत आंबवडे येथे ५००, चिखलगाव-धोंडेवाडी ५००, नाटंबी ४००, पिसावरे ४००, आपटी ४००, रायरी-साळव ३०० असे आंबवडे आरोग्य केंद्रात एकूण २ हजार ५०० लसीकरणाचे डोस उपलब्ध करण्यात आले होते.
आंबवडे येथे ३५९, चिखलगाव १८८, धोंडेवाडी १५७, रावडी ६२, कर्नावड ९९, नाटंबी ३८५, आपटी २५३, पिसावरे २८०, साळव ४४, रायरी ८१ असे एकूण १९०८ डोसचे वरील गावांतून लसीकरण करण्यात आले. नागरिकांनी लसीकरण सुरू झाल्यापासून हजेरी लावून उस्फूर्त प्रतिसाद दिला. यात पहिल्या टप्प्यातील लसीकरणाची टक्केवारी जास्त होती.
या महालसीकरणासाठी आंबवडे येथे डॉ. संजय भारती, डॉ. उमेश खोपडे, डॉ. नितीन जेधे, आरोग्यसेविका सुरेखा भालेराव, परिचार सुरेश दिघे, आशासेविका हर्षा ढमाळ, निर्मला बागल, विमल चिकणे, नकुशा निगडे, प्रमिला शेडगे, चिखलगाव विभागात डॉ. प्रदीप खांडेकर, आरोग्यसेविका मंजुश्री चिकणे,आरती भादेकर,गटप्रवर्तक कविता आलगुडे,आशासेविका गीता सणस,जयश्री धोंडे,अश्विनी सणस, रेश्मा आंबवले,अनिता कुडपणे यांनी लसीकरणाची व्यवस्था केली
आंबवडे आरोग्य केंद्र अंतर्गत पिसावरे गावात आरोग्य सहायक राजाराम कुंभार, आरोग्य सेविका अर्चना रजपूत, आरोग्यसेवक धनंजय रायजादे, आशा गटप्रवर्तक सोनाली खाटपे, अंगणवाडी सेविका सुवर्णा चौधरी, अनिता पिलाणे, आशा सेविका सुजाता प्रधान व रंजना खाटपे, आपटी येथे डॉ. श्रध्दा जालिंद्रे, आरोग्य सेविका स्वाती घायाळ, आशा सेविका वर्षा पारठे,आशा पारठे,रायरी व साळव येथे डॉ.गर्मे आरोग्य सेविका रेखा देशमुख,सहायक संतोष सोनवणे यांनी लसीकरणाचे काम पाहिले
नाटंबी गावात डॉ. स्नेहा पाठक, आरोग्य सेविका निंबाळकर, आशा सेविका रेश्मा कुडले, सविता खोपडे, सुगंधा चौधरी, वैशाली फाटक यांनी लसीकरण केले. तसेच वाहन चालक दिलीप देवघरे, केंद्रप्रमुख सुषमा पाटी, आपटी सोसायटी चेअरमन जगन्नाथ पारठे, माजी सरपंच रघुनाथ पारठे, सरपंच रेश्मा प्रधान, माजी सरपंच प्रकाश बरदाडे, अविनाश गायकवाड, वसंत पारठे, संदीप गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून मोहीम यशस्वी झाली.