हवेली तालुक्यातील १ लाख २९ हजार ९८७ बालकांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:13 IST2021-02-05T05:13:24+5:302021-02-05T05:13:24+5:30

आज देशात आणि राज्यात पल्स पोलिओ लसीकरण दिवस साजरा करण्यात येतोय. त्या निमित्ताने हवेली तालुक्यात लोणी काळभोर येथील प्राथमिक ...

Vaccination of 1 lakh 29 thousand 987 children in Haveli taluka | हवेली तालुक्यातील १ लाख २९ हजार ९८७ बालकांना लसीकरण

हवेली तालुक्यातील १ लाख २९ हजार ९८७ बालकांना लसीकरण

आज देशात आणि राज्यात पल्स पोलिओ लसीकरण दिवस साजरा करण्यात येतोय. त्या निमित्ताने हवेली तालुक्यात लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी लसीकरणाच्या अभियानाची सुरुवात केली. या निमित्ताने तालुक्यातील ५ वर्षांच्या आतील कोणतेही बालक यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. लसीकरणाचे हे अभियान दुर्गम भागातही यशस्वी व्हावं यासाठी आरोग्य विभागाकडून मोबाईल पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये ४६५ बुथवर एकूण १ हजार ३३० आरोग्य कर्मचा-यासमवेत आशा व अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.

हवेली तालुक्यात प्राथमिक आरोग्य केेंद्रनिहाय लसीकरण करण्यात आलेली बालके :

आरोग्य केेंद्राचे नाव - लसीकरणाचे उद्दिष्ट/ प्रत्यक्ष लसीकरण करण्यात आलेल्या बालकांची संख्या / टक्केवारी याप्रमाणे -

खानापूर - १३०२ / १५०७ / ११५.७ टक्के

देहू - ४३२९ / ४६८५ / १०८.२ टक्के

कुंजीरवाडी - ४३३५ / ४५९३ / १०६ टक्के

सांगरूण - ८१२५ / ८४७२ / १०४.३ टक्के

ऊरूळी कांचन - ५६०० / ५८२४ / १०४ टक्के

पेरणे - ४७५२ / ४८२२ / १०१ .५ टक्के

खेड शिवापूर - ८८९० / ८८३७ / ९९.४ टक्के

लोणी काळभोर - २३२६६ / २२१६५ / ९५.३ टक्के

वाघोली - २२७०३ / २१४११ / ९४.३ टक्के

फुरसुंगी - २७६३० / २५७९४ / ९३.४ टक्के

खडकवासला - २११८७ / १९३७२/ ९१.४ टक्के

वाडेबोल्हाई - २९८६ / २५०५ / ८३.९ टक्के

फोटो - हवेली तालुक्यात लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी लसीकरणाच्या अभियानाची सुरुवात केली.

Attachments area

Web Title: Vaccination of 1 lakh 29 thousand 987 children in Haveli taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.