सुट्ट्या पैशांअभावी फळविक्रीवर संक्रांत
By Admin | Updated: November 14, 2016 02:19 IST2016-11-14T02:19:46+5:302016-11-14T02:19:46+5:30
चलनातून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्याचा फटका फळबाजाराला मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील

सुट्ट्या पैशांअभावी फळविक्रीवर संक्रांत
पुुणे : चलनातून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्याचा फटका फळबाजाराला मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील फळ विभागातील काही व्यापाऱ्यांनी सोमवारपासून थेट व्यापार बंद ठेवण्याची भूमिका घेतली आहे. तर ग्राहकांअभावी माल पडून राहत असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी नवीन मालाची खरेदी थांबविली आहे.
मागीच पाच दिवसांपासून सुट्ट्या पैशांअभावी फळबाजारातील उलाढाल मंदावली आहे. सध्या डाळिंब, सीताफऴ, संत्रा, मोसंबी आदी फळ उत्पादक मोठ्या शेतकऱ्यांकडून बाजारात मोठ्या प्रमाणात फळांची आवक होत आहेत. बाजारात सुट्टे पैसे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने सुरुवातीला शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आडत्यांनी खरेदीदारांकडून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा घेतल्या. मात्र, शेतकरी या नोटा स्वीकारण्यास तयार नाहीत. मात्र, दररोज लाखोंची उलाढाल होत असल्याने या जुन्या लाखो रूपयांच्या नोटांचे काय करायचे काय, असा प्रश्न आडत्यांना पडला आहे. तर दुसरीकडे उधारीचे प्रमाण वाढत चालले आहे. फळबाजारात तुलनेने ५०० व हजार रुपयांच्या पटीत व्यवहार जास्त प्रमाणात होतात. आता हे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. मालाची विक्री होत नसल्याने काही व्यापाऱ्यांनी नवीन मालाची खरेदी थांबविली आहे.मालाची विक्री होत नसल्याने सोमवारपासून शेतकऱ्यांना बाजारात फळे न आणण्याचा सल्ला दिला आहे. खरेदीदारांकडून ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा दिल्या जात आहेत. या नोटा पुढे शेतकरी घेत नाहीत. त्यामुळे व्यापाराला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे सोमवारपासून व्यापार काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे एका फळ व्यापाऱ्याने सांगितले.