व्ही. के. सिंग यांच्या वक्तव्याचा निषेध

By Admin | Updated: October 28, 2015 01:24 IST2015-10-28T01:24:05+5:302015-10-28T01:24:05+5:30

हरियानातील दलित हत्याकांड आणि त्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्या विरोधामध्ये रिपब्लिकन पक्षासह सामाजिक संघटनांनी

V. Of Prohibition of Singh's remarks | व्ही. के. सिंग यांच्या वक्तव्याचा निषेध

व्ही. के. सिंग यांच्या वक्तव्याचा निषेध

खडकी : हरियानातील दलित हत्याकांड आणि त्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्या विरोधामध्ये रिपब्लिकन पक्षासह सामाजिक संघटनांनी रविवारी ठिकठिकाणी निदर्शने केली. सिंह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली, तर एका संघटनेने सिंह यांच्या विरोधात वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे
अध्यक्ष परशुराम वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली खडकी बाजार
येथील आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन सुरू झाले. सिंह यांच्या प्रतिमेचे दहन केले. वाडेकर
म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलितांवरील अत्याचार रोखावेत आणि सिंह यांची हकालपट्टी
करावी. बहुजन भीमसेनेने दलित हत्याकांडाचा निषेध करून सिंह यांच्या विरोधात वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रोहित पंचमुखे, नितीन सरोदे, प्रवीण गायकवाड, अब्दुल शेख, रफिक शेख आदी नेते उपस्थित होते.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
पिंपरी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दादरी व हरियानातील दलित हत्याकांडाचा जाहीर निषेध केला. हत्याकांडाच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर सचिव गणेश दराडे, नाथा सिंगाडे, अपर्णा दराडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच डॉ. सुरेश बेरी, किशोर मांदळे, अ‍ॅड. रमेश महाजन यांनी घटनेचा निषेध व्यक्त केला.
सम्यक युवक मंचाचे कार्यकर्ते, पुणे जिल्हा घरकामगार संघटनेच्या शहर सचिव नंदा शिंदे, उपाध्यक्षा जयश्री सानोसे, पार्वती ढवळे, श्रीदेवी गायकवाड, कविता जाधव, सविता जाधव, बांधकाम कामगार संघटनेचे शहर निमंत्रक एस.के. पोनापन, व्ही.के. कुंजुमन, अविनाश लाटकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
समाजवादी पार्टी
परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी राजीनामा देण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या रविवारी झालेल्या बैठकीत करण्यात
आली. या बैठकीत शहराचे अध्यक्ष रफीक कुरेशी, उपाध्यक्ष फारुख कुरेशी, पिंपरी विधानसभा अध्यक्ष दीपक श्रीवास्तव आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: V. Of Prohibition of Singh's remarks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.