- विवेक भुसेलोकमत न्यूज नेटवर्कपुणे : डोंगराळ भागात रस्ते बांधकाम, सुरुंगामुळे खडकांना भेगा पडलेल्याअसतात. अशाच या भेगांमध्ये बर्फ साचतो. त्यावरुन बर्फाचे थरावर थर साचतगेल्याने त्यांच्यावर दाब वाढत जातो. त्यातून असे हिमकडे कोसळतात. असाचप्रकार आज उत्तराखंडमध्ये घडला असण्याची शक्यता असल्याचे मत ज्येष्ठहवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.ऐनथंडी उणे तापमानात हिमकडा कोसळून उत्तराखंडमध्ये नद्यांना पूर आला.त्यात शेकडो लोक वाहून गेल्याची घटना रविवारी घडली. याबाबत ज्येष्ठहवामानतज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी लोकमत ला सांगितले की, सध्यावेस्टर्न डिस्ट्ररबन्समुळे जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमालयीन पर्वतरांगा येथे पाऊस, बर्फवृष्टी होत आहे. या भागात हिमालयीन डोंगररांगामध्येपावसाळ्यात नेहमीच भूस्ख्खलन होत असते. मात्र, हिवाळ्यात असे प्रकार कमीहोतात. या भागात रस्ते व इतर कामांसाठी डोंगरांमध्ये सुरुंगाचा वापर केलाजातो. त्यामुळे तेथील खडकांमध्ये भेगा पडलेल्या असतात. हिवाळ्यात पाऊस वबर्फवृष्टीमुळे त्यात पाणी, बर्फ साठून राहते व त्या भेगा वाढत जातात.बर्फवृष्टीमुळे त्यांचे थरावर थर साचत जाता. त्यांचे वजन पेलण्याच्यापुढे गेले की, ते मुळ खडकापासून वेगळे होऊन कोसळतात.सध्या जम्मू काश्मीर,उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे हा प्रकार घडला असावा, असेप्राथमिक माहितीवरुन जाणवत असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
Uttarakhand glacier burst: रस्ते बांधकाम, सुरुंगामुळे हिमकड्यांना भेगा पडल्या; पुण्याच्या हवामान शास्त्रज्ञांनाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 23:03 IST