शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

रसिकांनी अनुभवली ‘दमा’ शैली!; पुण्यात ‘उत्सव पुस्तकांचा, जागर वाचनाचा’ प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 12:36 IST

=अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे संयोजित आणि डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित ‘उत्सव पुस्तकांचा, जागर वाचनाचा’ या विशेष ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देरसिकांनी घेतला ‘भानाचे भूत’ या कथेचा आस्वादमाणसातील माणूसपण जपण्यासाठी कसदार ललित साहित्याच्या निर्मितीची गरज : अच्युत गोडबोले

पुणे : कथाकथनातून डोळ्यांसमोर हुबेहूब उभी राहणारी पात्रे, ग्रामीण भाषेतील लकबीतून होणारी संवादफेक, प्रेक्षकांनी मनमुराद हसत दिलेली दाद, सभागृहात फुललेला हास्यफुलोरा अशा रंगलेल्या वातावरणात ‘भानाचे भूत’ ही कथा ‘दमा’ शैलीतून उलगडत गेली. ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी शेतकरी आणि गावातील लोकांची विनोदगाथा उत्तम प्रकारे कथेतून मांडली. नव्वदीच्या उंबरठ्यावर असलेले ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे ‘तारुण्य’ या वेळी उपस्थितांना थक्क करून गेले. आचार्य अत्रे सभागृहात अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे संयोजित आणि डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित ‘उत्सव पुस्तकांचा, जागर वाचनाचा’ या विशेष ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिरासदार होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले उपस्थित होते. या वेळी द. मा. मिरासदार यांनी सांगितलेल्या ‘भानाचे भूत’ या कथेचा आस्वाद रसिकांनी घेतला. ‘बदलत्या काळातील विविध आव्हानांचा सामना सगळ्याच भाषांमधील साहित्याला करावा लागत आहे. साहित्य हे मानवी जीवन उन्नत करणारे एक प्रभावी माध्यम असून समाजातील दानशूरांनी साहित्यिक उपक्रमांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे’, असे आवाहन द. मा.नी केले.रसिका राठीवडेकर यांनी प्रास्ताविक केले. सिद्धार्थ बेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश राठीवडेकर यांनी आभार मानले. 

डॉ. पी. डी. पाटील म्हणाले की, ‘साहित्य क्षेत्रात प्रचंड चढउतार सुरू असून कसदार पुस्तकांच्या आवृत्या निघणे बंद झाले आहे. मराठी प्रकाशन व्यवसायाला नवसंजीवनी आणि चैतन्य प्राप्त करून देणे गरजेचे आहे. सध्याची पिढी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आॅनलाइन सुविधेचा लाभ घेत आहे. मात्र, त्यामुळे पुस्तकांच्या दुकानात सहकुटुंब जाऊन खरेदी करण्याचा आणि नव्या कोºया पुस्तकांचा दरवळ अनुभवण्याचा आनंद ही पिढी गमावते आहे. वाचन संस्कृती टिकवायची आणि वाढवायची असेल तर कसदार लेखक आणि कवींची फळी निर्माण करावी लागेल.’

गोडबोले म्हणाले, ‘ललित आणि विज्ञान असे साहित्याचे दोन प्रकार करून त्यामध्ये डावे-उजवे करणे ही खेदाची बाब आहे. माणसातील माणूसपण जपण्यासाठी कसदार ललित साहित्याच्या निर्मितीची गरज आहे. अस्सल ललितलेखनाची निर्मिती आणि त्याचे प्रकाशन या दोन्ही बाबतींत आग्रही राहणे गरजेचे आहे. सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे. बदलत्या तंत्रज्ञानाचा अंगीकार साहित्य क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी केला पाहिजे.’  

टॅग्स :PuneपुणेP D Patilपी डी पाटील