शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उस्ताद झाकीर हुसेन यांना 'पु.ल. स्मृती सन्मान : हृदयनाथ मंगेशकरांना 'जीवनगौरव'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 17:20 IST

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना  ‘पु.ल स्मृती सन्मान’ सर्जनशील, प्रतिभावान संगीतकार अशी ओळख असलेल्या हदयनाथ मंगेशकर यांना  ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुणे : भारतीय अभिजात संगीत क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटविलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना  ‘पु.ल स्मृती सन्मान’ तर ’मंगेशकर’ या पंचाक्षरी अमिट नाममुद्रेतील एक सर्जनशील, प्रतिभावान संगीतकार अशी ओळख असलेल्या हदयनाथ मंगेशकर यांना  ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ व लेखक डॉ. जयंत नारळीकर व शब्दविरहित बोलक्या चित्रांच्या माध्यमातून ठसठशीत आणि लयबद्ध शैलीने पाच दशकांहून अधिक काळ रसिकांच्या चेह-यावर हास्यलकेर उमटविणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द फडणीस यांचाही  विशेष सन्मान करण्यात येणार आहे.         पु.ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘पु.ल परिवार’ आणि  ‘आशय सांस्कृतिक’ च्या वतीने आयोजित यंदाच्या पुलोत्सवात या संगीत, कला, साहित्य क्षेत्रातील दिग्गजांचा गौरव केला जाणार आहे. येत्या 17 ते 25 नोव्हेंबर दरम्यान पुण्यात  ‘पुलोत्सव’ रंगणार आहे.  पुलोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यात पं. हदयनाथ मंगेशकर यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते  ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

           गुरूवार दि. 22 नोव्हेंबर रोजी डॉ. जयंत नारळीकर यांचा विशेष सन्मान  ज्येष्ठ साहित्यिक द.मा मिरासदार यांच्या हस्ते होणार आहे तर शुक्रवार दि. 23 नोव्हेंबर रोजी शि.द फडणीस यांना ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते गौरविले जाणार आहे. पुलोत्सवाच्या समारोपात ज्येष्ठ तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते  ‘पु.लं स्मृती सन्मान’ प्रदान केला जाणार आहे. यावेळी झाकीर हुसेन यांच्याशी डॉ. पटेल संवाद साधणार आहेत. 

टॅग्स :Zakir Hussainझाकिर हुसैनHridaynath Mangeshkarहृदयनाथ मंगेशकरcultureसांस्कृतिक