सेंद्रिय खताच्या वापरामुळे ऊसपीक जोमदार - बाजीराव सुतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:16 IST2021-02-23T04:16:27+5:302021-02-23T04:16:27+5:30

इंदापूर तालुक्यातील मौजे कालठण नं. २ येथील प्रगतिशील शेतकरी सुदाम चंद्रभान पाडुळे यांनी ऊस पिकासाठी कर्मयोगी सेंद्रिय खत वापरल्याने ...

Usip Jomdar due to use of organic manure - Bajirao Carpenter | सेंद्रिय खताच्या वापरामुळे ऊसपीक जोमदार - बाजीराव सुतार

सेंद्रिय खताच्या वापरामुळे ऊसपीक जोमदार - बाजीराव सुतार

इंदापूर तालुक्यातील मौजे कालठण नं. २ येथील प्रगतिशील शेतकरी सुदाम चंद्रभान पाडुळे यांनी ऊस पिकासाठी कर्मयोगी सेंद्रिय खत वापरल्याने तसेच पडस्थळ, पिंपरी या भागातील प्लॉटची पाहणी पण या प्रसंगी करण्यात आली. या भागातील बहुतांश शेतकरी रासायनिक खतांचा अत्यल्प वापर करुन सेंद्रिय खतांचा मुबलक प्रमाणात वापर करीत असल्याचे शेतकरी सुदाम पाडुळे यांनी आवर्जुन सांगितले.

सुतार म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील व व्हाईस चेअरमन पद्माताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट अशा सेंद्रिय व जैविक खताचे उत्पादन सुरू असून दिवसेंदिवस यास सभासदांचा प्रतिसाद वाढत आहे. “कर्मयोगी शिवार फेरी” योजनेअंतर्गत कारखान्याने विविध भागातील सभासदांच्या प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम चालू केलेला आहे.तसेच सभासदांनी मातीपरीक्षण तसेच जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक खते वापरण्याबाबत आवाहन केले.पर्यावरण व्यवस्थापक यांनी जमिनीचा कर्ब व सेंद्रिय खतांचे महतत्त्व या विषयांवर मार्गदर्शन केले.

यावेळी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी एस.जी.कदम, ऊसविकास अधिकारी गणेश पोळ, पर्यावरण व्यवस्थापक जे.व्ही.माने व कालठण भागातील विलास साहेबराव पाडुळे, सुनील रामदास जगताप, गणेश गोविंद मेंगडे, राहूल लालासो जगताप, वर्षल मोहन पाडुळे, हारुन अब्दुल मुलाणी, आदिकराव भिमराव रेडके, संतोष बबन जगताप हे शेतकरी उपस्थित होते

.इंदापूर तालुक्यातील कालठण नंबर.२ येथील उसाच्या शेतीची पाहणी करताना अधिकारी-कर्मचारी.

Web Title: Usip Jomdar due to use of organic manure - Bajirao Carpenter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.