बाह्यवळण रस्त्यासाठी टीडीआरचा वापर

By Admin | Updated: November 4, 2015 04:11 IST2015-11-04T04:11:21+5:302015-11-04T04:11:21+5:30

भूसंपादनाअभावी तब्बल ३० वर्षे रेंगाळलेल्या बाह्यवळण रस्त्यासाठी (हाय कपॅसिटी मास ट्रान्सपोर्ट रूट-एचसीएमटीआर) डेव्हलपमेंट टीडीआर (ट्रान्सफर आॅफ डेव्हलपमेंट राईट)

Use of TDR for outlying road | बाह्यवळण रस्त्यासाठी टीडीआरचा वापर

बाह्यवळण रस्त्यासाठी टीडीआरचा वापर

पुणे : भूसंपादनाअभावी तब्बल ३० वर्षे रेंगाळलेल्या बाह्यवळण रस्त्यासाठी (हाय कपॅसिटी मास ट्रान्सपोर्ट रूट-एचसीएमटीआर) डेव्हलपमेंट टीडीआर (ट्रान्सफर आॅफ डेव्हलपमेंट राईट) राबविण्यास स्थायी समितीने आज मंजुरी दिली. समितीमधील भारतीय जनता पक्षाच्या ३ सदस्यांनी या विषयाला विरोध केला, त्यामुळे मतदान होऊन ३ विरुद्ध १० मतांनी हा विषय मंजूर झाला. ३ सदस्य अनुपस्थित होते.
स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांनी ही माहिती दिली. शहराच्या मध्यभागावरील वाहतुकीचा ताण फार मोठ्या प्रमाणात कमी करणारा हा एचसीएमटीआर रस्ता गेली तब्बल ३० वर्षे रेंगाळला आहे. त्याची लांबी एकूण ३४ किलोमीटर आहे. त्यासाठी काही सरकारी, तर काही खासगी जागा संपादन करणे गरजेचे होते. त्याची रक्कम एकूण १५०० कोटी रुपये होत होती. जागा मालकाला त्याच्या बदल्यात टीडीआर द्यावा लागतो. राज्य सरकारचाही याला काही आक्षेप असणार नाही. त्यामुळे हा विषय मंजूर करावा, असे उपमहापौर बागुल यांनी प्रस्तावात म्हटले होते.
समितीत हा विषय चर्चेला आल्यानंतर भाजपाच्या मुक्ता टिळक, राजेंद्र शिळीमकर व श्रीकांत जगताप या सदस्यांनी विरोध केला. हा विषय तातडीचा नाही, त्यामुळे तो पुढच्या सभेत घ्यावा, असे त्यांचे म्हणणे होते; मात्र काँग्रेसचे अविनाश बागवे यांनी या कामाची गरज सविस्तरपणे विषद केली. (प्रतिनिधी)

Web Title: Use of TDR for outlying road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.