महापौरांकडून खासगी कारचा वापर

By Admin | Updated: June 28, 2017 04:05 IST2017-06-28T04:05:18+5:302017-06-28T04:05:18+5:30

महापालिकेने दिलेली मोटार नादुरु स्त झाल्याने महापौर नितीन काळजे यांनी खासगी मोटार वापरण्यास सुरु वात केली आहे.

Use of private car by Mayor | महापौरांकडून खासगी कारचा वापर

महापौरांकडून खासगी कारचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : महापालिकेने दिलेली मोटार नादुरु स्त झाल्याने महापौर नितीन काळजे यांनी खासगी मोटार वापरण्यास सुरु वात केली आहे. त्यावर महापौरांचे नामफलक लावण्यात आलेले आहे.
महापालिका प्रशासनाने महापौरांना दिलेली गाडी नादुरुस्त असल्याने त्यांना कार्यक्रमाला दांडी मारावी लागली होती. त्याविषयी महापौर काळजे यांनी जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली होती. त्यानंतरही प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही. मात्र, महापौरांचा नवीन गाडीसाठी अट्टाहास सुरू असल्याची टीका झाली होती. त्या पार्श्वभूमीवर महापौर यांनी खासगी गाडीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Use of private car by Mayor