संधीचा उपयोग करून यश मिळवावे : जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:12 IST2021-08-23T04:12:50+5:302021-08-23T04:12:50+5:30

श्री भैरवनाथ विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाबळ ता. शिरूर या विद्यालयातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक वाटप ...

Use the opportunity to achieve success: Jadhav | संधीचा उपयोग करून यश मिळवावे : जाधव

संधीचा उपयोग करून यश मिळवावे : जाधव

श्री भैरवनाथ विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाबळ ता. शिरूर या विद्यालयातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक वाटप व विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते. या वेळी आदिती अनिल खैरे या विद्यार्थिनीला ९५ टक्के गुण मिळाल्याबद्दल एचएससी बोर्डाने तिला, पुढील ४ वर्षांसाठी, प्रत्येक वर्षी रू. ८० हजाराचे विशेष प्रावीण्य पारितोषिक दिल्यामुळे तिचा सत्कार प्राचार्य अविनाश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष भगवान घोडेकर, सचिन वाबळे, कर्ण रायकर, बाळासाहेब वरखडे, शिवाजी पानसरे, उपमुख्याध्यापक सुदाम पिंगळे, पर्यवेक्षक तुकाराम ताम्हाणे, आनंदा गावडे, रोहिदास चौधरी, संदीप गवारी, अरुण निकम, किरण रेटवडे,काळूराम गव्हाणे, निळकंठ पाटील, एम. जी. पटेल उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष क्षीरसागर यांनी केले, तर आभार जितेंद्रकुमार थिटे यांनी मानले.

२२ शिक्रापूर

पाबळ येथील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मान्यवर.

Web Title: Use the opportunity to achieve success: Jadhav