ओपन जीमच्या साहित्यांचा वापर जनावरे बांधण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:07 IST2020-12-23T04:07:44+5:302020-12-23T04:07:44+5:30

जिल्हा परीषदेच्या वतीने ग्रामीण भागात व्यायामाकडे तरुणांनी वळावे आणि सर्वानाच व्यायामाची सोय व्हावी म्हणून ओपन जिमची संकल्पना राबवण्यासाठी विविध ...

Use of open gym materials to build animals | ओपन जीमच्या साहित्यांचा वापर जनावरे बांधण्यासाठी

ओपन जीमच्या साहित्यांचा वापर जनावरे बांधण्यासाठी

जिल्हा परीषदेच्या वतीने ग्रामीण भागात व्यायामाकडे तरुणांनी वळावे आणि सर्वानाच व्यायामाची सोय व्हावी म्हणून ओपन जिमची संकल्पना राबवण्यासाठी विविध लोखंडी जिमचे साहित्य जिल्हा परीषद सदस्यांच्या शिफारशी नुसार वाटप करण्यात आले. या जीम साहित्य लावण्यासाठी अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीने त्यांच्या मालकीच्या जमिनी दिल्या आहेत. गुंडाळवाडी येथे सुध्दा नागरिकांच्या आरोग्याासाठी अशी ओपन जीम सुरु करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला होता. त्यासाठी जिल्हा परिषदेने निधीही दिला होता. त्यानुसार गावात ओपन जिमचे साहित्य आले मात्र ते मोकळ्या जागी लावण्यात आले नाहीत त्यामुळे ते पडून राहिले. अनेक वर्षापासून त्याच्याकडे ना प्रशासनाने लक्ष दिले ना गावकऱ्यांनी ते बसविण्याची मागणी केली त्यामुळे ते पडल्याठिकाणी वापरावविना नादुरुस्त झाले. त्यामुळे नागिरिकांनी त्याचा वापर थेट जनावरे बांधण्यासाठी सुरु केला आहे.

--

२२ राजगुरुनगर जनावरे बांधण्यासाठी वापर

फोटो ओळी : गुंडाळवाडी ता. खेड येथे जीमचे साहित्य उघड्यावर पडले असुन साहित्याची दुरवस्था झाली आहे.

Web Title: Use of open gym materials to build animals