हेल्मेट वापरा, कारण डोकं आहे!
By Admin | Updated: February 13, 2016 03:15 IST2016-02-13T03:15:11+5:302016-02-13T03:15:11+5:30
शहरात झालेला हेल्मेट सक्तीचा कायदा... त्याविरोधात होणारी निदर्शने... चौैकाचौैकात होणारी वाहतूक पोलिसांची कारवाई... त्याविरोधात व्यक्त होणारा सामान्यांचा

हेल्मेट वापरा, कारण डोकं आहे!
पुणे : शहरात झालेला हेल्मेट सक्तीचा कायदा... त्याविरोधात होणारी निदर्शने... चौैकाचौैकात होणारी वाहतूक पोलिसांची कारवाई... त्याविरोधात व्यक्त होणारा सामान्यांचा संताप... पोलिसांशी
सुरु असलेली हुज्जत असे चित्र काही दिवसांपासून शहरात आहे. या पार्श्वभूमीवर वैयक्तिक सुरक्षेसाठी हेल्मेट आवश्यक असल्याचा संदेश जनजागृती रॅलीतून पुण्यात देण्यात आला. वाहतूक पोलिसांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
पुण्यातील किंग्ज रॉयल रायडर्स ग्रुपने हेल्मेटसक्तीला पाठिंबा दर्शवण्यासाठी शहरातून हेल्मेट रॅली काढली. सामान्यांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व कळावे आणि जनजागृती व्हावी, हा या रॅलीमागचा हेतू होता. बाणेर ते डेक्कन दरम्यान ही रॅली काढण्यात आली.
जनजागृती रॅलीदरम्यान ‘सिर सलामत तो पगडी पचास’, ‘हेल्मेट सक्तीला माझा पूर्ण पाठिंबा आहे, कारण मला डोकं आहे’, ‘वापराल शीरस्त्राण, तर वाचतील प्राण’, ‘से येस टू हेल्मेट’ असे जागृतीपर संदेशांचे फलक हातात घेतले होते.
फर्ग्युसन रस्ता, पुणे कॅम्प, आरटीओ, काऊन्सिल हॉल या मार्गावरून हेल्मेट घालून जाणारे दुचाकीस्वार अणि त्यांच्या पाठीला लावलेले फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. सोहन रॉय आणि स्नेहलकुमार भावसार यांनी रॅलीचे नेतृत्व केले. सकारात्मक बदलांना पाठिंबा देण्याची शपथ या वेळी या ग्रुपने घेतली.