शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन चाखणार बारामतीतील आंबे; राज्यातील दर्जेदार आंबे सातासमुद्रापार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 19:11 IST

गुरुवारी अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये भारतीय आंबा प्रचार कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय...

बारामती : बारामती येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पणन मंडळाने उभारलेल्या निर्यात केंद्रातील आंबे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पाठविण्यात आले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडीयावर राज्यातील दर्जेदार आंबे सातासमुद्रापार अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पोहचल्याची आनंदाची बातमी ‘शेअर’ केली आहे.

सोशल मीडियावर खासदार सुळे यांनी केलेले कौतुक चर्चेचा विषय ठरले आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पाठविण्यात येणाऱ्या आंब्यामध्ये हापूस, केशर आणि गोवा मानकुर आंब्याचा समावेश आहे. राज्यातील दर्जेदार आंबे सातासमुद्रापार अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पोहचल्याची अतिशय आनंदाची बाब आहे. रेनबो इंटरनॅशनलचे हार्दिक अभिनंदन, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी निर्यातदारांचे अभिनंदन केले आहे.

या वर्षी रेनबो इंटरनॅशनल या संस्थेने जळोचीतून निर्यात केलेले आंबे थेट आता व्हाईट हाऊसमध्ये पोहोचणार आहेत. गुरुवारी अमेरिकेत वॉशिंग्टन या राजधानीत भारतीय आंबा प्रचार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये या आंब्यांची पेटी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसकडे सुपूर्द करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.

रेनबो इंटरनेशनल संस्थेचे प्रमुख अभिजीत भसाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, २०१९ मध्ये आपण ३०० टन आंबे पाठविले होते. कोविड काळात अमेरीकेत आंबा निर्यात पूर्ण बंद होती. यावर्षी आजअखेर १०० टन आंबा पाठविण्यात आला आहे. विमानाचे इंधनदरवाढ झाल्याने विमानभाडे वाढ झाली आहे.परिणामी अमेरिकेत २५ डॉलरला मिळणार आंबा दुप्पट म्हणजेच ५० डॉलरवर पोहचला आहे.

टॅग्स :PuneपुणेJoe Bidenज्यो बायडनMangoआंबाAmericaअमेरिका