उरुळी कांचन ग्रामपंचायतीची ओढे-नाले सफाईची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:43+5:302021-06-09T04:13:43+5:30
मागील वर्षी पावसाळ्यामध्ये उरुळी कांचन गावात असणाऱ्या दोन्ही ओढ्यांना दोनवेळा सुमारे १५-२० वर्षांनंतर मोठा पूर आल्याने संपूर्ण गावांमध्ये पाणी ...

उरुळी कांचन ग्रामपंचायतीची ओढे-नाले सफाईची लगबग
मागील वर्षी पावसाळ्यामध्ये उरुळी कांचन गावात असणाऱ्या दोन्ही ओढ्यांना दोनवेळा सुमारे १५-२० वर्षांनंतर मोठा पूर आल्याने संपूर्ण गावांमध्ये पाणी शिरून गावातील जनजीवन सुमारे २४ तासांहून जास्त वेळ विस्कळीत झाले होते.याला कारणीभूत असलेला नाल्या मधील गाळ व घाण आणि झाडेझुडपे ही वेळेत न काढली गेल्यामुळे मागील वर्षी मोठा अनर्थ घडला होता. याचे भान ठेवून यावर्षी ग्रामपंचायतीने या ओढ्यांची व नाल्यांची साफसफाई करण्याची लगबग माॅन्सूनपूर्वीच सुरू केली आहे. ग्रामपंचायतीचे सर्व सफाई कर्मचारी, जेसीपी मशीन, ट्रॅक्टर, कचरा वाहतुकीच्या गाड्या या सगळ्या मशिनरी व वाहनांसहित उरुळी कांचन ग्राम स्वच्छता अभियान ग्रुपच्या सभासदांच्या सहकार्यातून यावेळी पावसाळ्यापूर्वीच ओढ्यांची व नाल्यांची साफ सफाई करून कचरा बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस यांनी सांगितले की, मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन पावसाळ्या पूर्वीच उरुळी कांचन गावातून वाहत जाणारा ओढा साफ करून भविष्यातील पावसाळ्यात होणारे नुकसान टाळण्याचा आमचा प्रयत्न आहे.
काम लवकर सुरू करण्यात यावे, अशा सूचना सरपंच संतोष कांचन व उपसरपंच संचिता कांचन यांनी सफाई कर्मचारी व ग्राम विकास अधिकारी यांना दिल्या होत्या.
उरुळी कांचन गावातील ओढ्यावरील पुलाजवळ घोडा साफसफाई करण्याचे काम चालू असताना.