शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरांसाठी समूह विकास गरजेचा, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 14:53 IST

राज्यात ज्या महापालिका आणि नगरपालिकांचे विकास आराखडे रखडले आहेत, ते तातडीने मान्य करा, अशा सूचना नगरविकास विभागाला केल्या

पुणे : शहरांची झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अस्तित्वातील इमारतींचा स्वतंत्र विकास न करता त्यांचा समूह विकास अर्थात क्लस्टर विकास केल्यास त्यांना मोकळ्या जागा, बागा, मैदाने यासारख्या सुविधा पुरविल्या जाऊ शकतात. नगर नियोजन योजनांची (टीपी स्कीम) अंमलबजावणी शहरांलगतच्या भागात करता येईल. यासाठी शहर आराखडा विभाग (अर्बन डिझाइन विंग) स्थापन करण्याचे नगर नियोजन विभागाला सांगण्यात आले आहे. सल्लागारांच्या माध्यमातून शहरांचा नियोजनबद्ध विकास करता येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच राज्यात ज्या महापालिका आणि नगरपालिकांचे विकास आराखडे रखडले आहेत, ते तातडीने मान्य करा, अशा सूचना नगरविकास विभागाला केल्या आहेत.नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित नगर रचना परिषदेचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, नगर रचना विभागाचे अतिरिक्त सचिव असिमकुमार गुप्ता, नगररचना संचालक अविनाश पाटील, पीएमआरडीएचे महानगर नियोजनकार सुनील मरळे, सहसचिव प्रतिभा भदाणे उपस्थित होते.पवार म्हणाले, शहराचा विकास आराखडा मंजूर होण्यास विलंब होत असल्याचे सांगून संबंधित भागांचा विकास ठप्प होतो. त्यामुळे विकास आराखड्यांऐवजी नगर रचना योजना करण्यावर भर दिला पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.शिंदे म्हणाले, “मुंबई व ठाण्यात क्लस्टर विकासातून काम सुरू झाले आहेत. त्यात एमएमआरडीए, म्हाडा, सिडको महापालिका अशा संस्था सहभागी झाल्या आहेत. आता ही योजना पुण्यातही राबविण्याची गरज असून त्यात महापालिका पीएमआरडीए यांनी सहभागी व्हावे. या क्लस्टर विकासातून मोठ्या प्रमाणावर मोकळ्या जागा, बागा, मैदाने उपलब्ध होणार आहेत. या क्लस्टर विकासातील त्रुटी दूर केल्याने सामान्य नागरिकांना फायदा होणार आहे. अविनाश पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. यावेळी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना माननीय यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEknath Shindeएकनाथ शिंदे