शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

#UPSC result : 'स्वप्न आपोआप पाठलाग करतील, फक्त जिद्द सोडू नका'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 20:47 IST

यश मिळाल्यानंतर ते डोंगराएवढे दिसत असले तरी त्यामागचे कष्ट हे समुद्राएवढे असतात. लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश  देशात १६व्या आलेल्या तृप्ती अंकुश दोडमिसे यांची ही कहाणी अशीच आहे.

पुणे : यश मिळाल्यानंतर ते डोंगराएवढे दिसत असले तरी त्यामागचे कष्ट हे समुद्राएवढे असतात. लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशात १६व्या आलेल्या तृप्ती अंकुश दोडमिसे यांची ही कहाणी अशीच आहे. ध्येय निश्चित झाल्यावर जिद्दीने, कष्टाने त्याचा पाठलाग करणाऱ्या तृप्ती यांचा आदर्श सर्वांनीच घ्यावा असा आहे. 

तृप्ती या लहानपणापासून अतिशय हुशार आहेत. त्यांचे आई-वडील प्राथमिक शिक्षक. त्यामुळे शिक्षणाचे बाळकडूच मिळालेल्या त्यांना कधीही अभ्यासासाठी बोलणी बसली नाहीत. मनापासून अभ्यासाची आवड असणाऱ्या तृप्ती १० वी आणि १२ वी या दोनही वर्षी बोर्डात अनुक्रमाने १० व्या आणि ११व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर २०१०साली त्यांनी प्रोडक्शन इंजिनिअरिंग करत प्रसिद्ध पुणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीओई) मधून पदवी घेतली. मात्र त्यानंतर नोकरी करून तुलनेने चारचौघांप्रमाणे आयुष्य जगण्याऐवजी त्यांनी स्पर्धा परीक्षेचा खडतर मार्ग जोपासला. त्यातही त्यांना दुसऱ्याच प्रयत्नात यश आले आणि पुण्यात त्या सहाय्यक विक्रीकर आयुक्त म्हणून रुजू झाल्या. 

दरम्यानच्या काळात त्यांची जीवनगाठ सुधाकर नवत्रे यांच्याशी बांधली गेली. लग्नानंतरही क्लास वन अधिकारी आणि विशेषतः प्रशासकीय सेवा क्षेत्राचे स्वप्न त्यांची पाठ सोडत नव्हते. दिवसभर १० ते ६ नोकरी आणि सकाळ- संध्याकाळ मिळून चार ते पाच तास अभ्यास असा त्यांचा दिनक्रम होता. या काळात गृहिणी म्हणून घरच्या जबाबदाऱ्याही त्या यशस्वीपणे पार पाडत होत्याच. पण अखेर त्यांच्या कष्टांचे चीज झाले आणि दुसऱ्या प्रयत्नात त्या देशाच्या क्षितिजावर चमकल्या. त्यांच्या या यशाने दोडमिसे आणि नवत्रे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. 

या सर्व अनुभवाबद्दल तृप्ती म्हणतात, 'यशाचा आनंद तर खूप आहे. पण त्यात मी एकटी नाही तर माझ्या सासर आणि माहेरच्या मंडळींचा आणि विशेषतः सुधाकर यांचा मोठा वाटा  आहे. त्यांच्या पाठिंब्यावर मी इथंपर्यंत पोचू शकले. मी निराश होऊन अभ्यास सोडणाऱ्या मुलांना एवढंच सांगेन की,तुम्ही चिकाटी आणि जिद्द सोडू नका, स्वप्न आपोआप तुमचा पाठलाग करत भेटायला येतील'. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाEducationशिक्षणdighiदिघी