शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
2
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
3
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
4
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
5
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
7
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
8
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
9
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
10
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
11
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
12
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
13
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
14
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
15
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
16
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
17
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
18
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
19
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
20
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 

mpsc EXAM: नांदेडचा शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2018 8:36 PM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेत नांदेडचा शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम आला आहे.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेत नांदेडचा शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम आला आहे. महिलांमधून सांगलीच्या शीतल बंडगर, तर मागासवर्गीयातून ठाण्यातील प्रमोद केदार प्रथम आले आहेत.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने विक्रीकर निरीक्षक पदाच्या २५१ जागांसाठी ७ जानेवारी २०१८ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल बुधवारी दुपारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत खुल्या गटाचा कटआॅफ १२३ गुण, अनुसूचित जाती संवर्ग १२३, अनुसूचित जमातीचा ११४, इतर मागासवर्ग (ओबीसी) १२३, विशेष मागास प्रवर्ग १२८, डीटी (ए) १२७, एनटी (बी) १२८, शारीरिक अपंग १३० असा कटआॅफ लागला आहे.सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षेसाठी राज्यातून ३ लाख ३० हजार ९०९ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेतून विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेसाठी ४ हजार ४३० उमेदवार पात्र ठरले होते. त्यानंतर ७ जानेवारी २०१८ रोजी मुख्य परीक्षा पार पडली. या परीक्षेत १५६ इतके सर्वाधिक गुण मिळवून शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम आला आहे.या निकालात पात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, त्यांनी त्यांची गुणपत्रके प्रोफाइलमध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आयोगाकडे आॅनलाइन अर्ज करावे असे आयोगाच्या उपसचिव विजया पडते यांनी स्पष्ट केले आहे. विक्रीकर निरीक्षक पदाच्या २५१ जागांसाठी ३ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग