शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

५०हून अधिक वर्षांची परंपरा जपणारे अप्सरा आईस्क्रीम आता हिंजवडीत! ५०हून अधिक वर्षांची परंपरा असणारा ‘कूल ब्रॅण्ड’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 20:34 IST

सर्व उत्पादनांना ग्राहकांची लोकप्रियता तर मिळालीच पण त्याचबरोबर या फ्रँचायझी-आधारित मॉडेलमुळे व्यवसाय विस्तारही होऊ लागला.

मुंबई/ पुणे : १९७१ मध्ये दक्षिण मुंबईतील वाळकेश्वरपासून अप्सरा आईस्क्रीम्सने आपला प्रवास सुरू केला.  गेली अनेक वर्षे अप्सरा आईस्क्रीम ग्राहकांच्या सेवेत आहे. लग्नसोहळा, छोटेखानी कार्यक्रम याठिकाणी त्यांना विशेष मागणी आहे. पुढच्या पिढीने जेव्हा या व्यवसायात प्रवेश केला त्यानंतर अप्सरा आईस्क्रीममध्ये बदलाचे व विस्ताराचे वारे वाहू लागले. पवई, अंधेरी, लोखंडवाला आणि किंग सर्कल यांसारख्या मुंबईतील प्रमुख ठिकाणांवर अप्सराच्या शाखा सुरु झाल्या. तसेच फ्रँचायझी-आधारित मॉडेललही त्यांनी विकसित केले. त्याचा सकारात्मक परिणाम एकुण व्यवसायावर दिसू लागला. सर्व उत्पादनांना ग्राहकांची लोकप्रियता तर मिळालीच पण त्याचबरोबर या फ्रँचायझी-आधारित मॉडेलमुळे व्यवसाय विस्तारही होऊ लागला.

२०१५मध्ये नेरुळ (नवी मुंबई) येथे पहिले फ्रँचायझी आउटलेट उघडले गेले. २०१७ पर्यंत ३ शहरांमध्ये २५ ठिकाणी अप्सरा आईस्क्रीमच्या शाखा होत्या.२०२० पर्यंत या ब्रॅण्डने शंभरीचा टप्पा गाठला. लोकप्रियता आणि वाढत्या मागणीमुळे ठाण्यात १०,००० चौरस फूट इतके एक अत्याधुनिक सोयी सुविधा असणारे फॅक्टरी आऊटलेटही सुरु करण्यात आले. 

५०हून अधिक फ्लेवर्स आणि १२५हून अधिक आऊटलेट असा व्यवसाय विस्तार आजपर्यंत केला गेला आहे. २०२१मध्ये त्यांनी ५० वर्षांचा टप्पा पार केला.५० वर्षांहून अधिक काळ ग्राहकांच्या सेवेत असणाऱ्या या अप्सरा ब्रॅण्डची आता पुण्यातील हिंजवडी येथे देखील नवी शाखा सुरु झाली आहे. नैसर्गिकरित्या ताज्या फळांपासून तयार होणारे हे आईस्क्रीम असल्याने सिझनल फळांनुसारच मिळते.त्यात कोणतेच इसेन्स वापरले जात नाही.तसेच अत्यंत नावीन्यपूर्ण अशा फ्लेवर्सचे आईस्क्रीम इथे मिळते. फेस्टिवल विशेष, पॉप्सिकल,झिरो शुगर,विगन, कुल्फी,शेक्स असे वेगवेगळे प्रकार इथे उपलब्ध आहेत. 

ग्राहकांच्या आवडी-निवडीचा विचार करुन तसेच चवींची विविधता आणि आरोग्याचा विचार करत इथे फ्लेवर्स निर्माण करण्यात आले आहेत.आणि हीच गोष्ट त्यांच्या यशाचे आणि लोकप्रियतेचे गमक आहे असे त्यांचे मत आहे. गेली ५ दशकं सातत्यानं ग्राहकांच्या पसंतीस असलेल्या या ब्रॅण्डची आता पुण्यात वाकड, विमान नगर, एमजी रोड, खराडी, वानोवरी, मगरपट्टा, बिबवेवाडीसह हिंजवडीतही शाखा आहे.मुंबईकरांसह आता पुणेकरांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी अप्सरा आईस्क्रीम कार्यरत आहे. या अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि चविष्ट अशा अप्सरा आईस्क्रीम पार्लर आपणही नक्की भेट द्या!

पत्ता : युनिट क्रमांक D-11, तळमजला, डी ब्लॉक, डेस्टिनेशन हिंजवडी, S.No.221/A6, गोदरेज 24 च्या पुढे, हिंजवडी, हवेली, पुणे, 411057आउटलेट संपर्क क्रमांक: +91 7738377410

(इतर शाखांचे डिटेल्स apsaraicecreams.com वर उपलब्ध)

टॅग्स :Puneपुणे