महापालिकेतील कंत्राटी कामगार विनावेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:13 IST2021-09-22T04:13:22+5:302021-09-22T04:13:22+5:30

पुणे : महापालिकेच्या मोटार वाहन विभागातील १७५ कंत्राटी कामगारांनी मंगळवारी दुपारी काम बंद आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी आयुक्त, वाहन ...

Unpaid contract workers in the corporation | महापालिकेतील कंत्राटी कामगार विनावेतन

महापालिकेतील कंत्राटी कामगार विनावेतन

पुणे : महापालिकेच्या मोटार वाहन विभागातील १७५ कंत्राटी कामगारांनी मंगळवारी दुपारी काम बंद आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी आयुक्त, वाहन विभाग प्रमुख यांना निवेदन देत दोन महिन्यांचे वेतन झाले नाही, तर काम बंद करण्याचा इशारा दिला.

सलग १० वर्षांपासून हे कंत्राटी कामगार या विभागात काम करत आहेत. त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळत नाही. गणेशोत्सव तसेच अन्य सण असूनही त्यांना सलग दोन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. त्यांनी मंगळवारी दुपारी अचानक काम बंद केले. त्यानंतर कामगार युनियनचे चंद्रकात गमरे यांच्यासमवेत त्यांनी महापालिका आयुक्त तसेच मोटार वाहन विभाग प्रमुखांना निवेदन केले.

त्यात त्यांनी येत्या दोन दिवसात वेतन झाले नाही तर काम बंद करण्याचा इशारा दिला.

Web Title: Unpaid contract workers in the corporation