ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:11 IST2021-03-09T04:11:49+5:302021-03-09T04:11:49+5:30
ज्ञानेश्वर विद्यालयात रविवारी (दि.७) शिक्षण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरेश वडगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये सुरेश धनराज वडगांवकर, ...

ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांची बिनविरोध निवड
ज्ञानेश्वर विद्यालयात रविवारी (दि.७) शिक्षण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरेश वडगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये सुरेश धनराज वडगांवकर, विलास गोपाळराव कुऱ्हाडे, अजित सुरेश वडगांवकर यांची आजीव सभासद गटातून तर आश्रयदाता सभासद गटातून डॉ. ज्ञानेश्वर श्रीधर पाटील व सर्वसाधारण सभासद गटातून पांडुरंग चंद्रकांत कुऱ्हाडे, प्रकाश देवराम काळे व लक्ष्मण गुलाबराव घुंडरे यांची विश्वस्तपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित विश्वस्तांचा सभासद ॲड. राजेंद्र मुथ्था, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, महिंद्रभाई कोठारी आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पदाच्या माध्यमातून संस्थेला तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रबिंदू मानून काम करण्यात येईल अशी ग्वाही नवनिर्वाचित विश्वस्तांनी दिली. दरम्यान संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांनी सभेचे कामकाज चालविले. तर खजिनदार डॉ. ज्ञानेश्वर पाटील यांनी ऑडिट रिपोर्ट व अंदाजपत्रकाचे वाचन केले. प्रकाश काळे यांनी आभार मानले.
फोटो ओळ : आळंदीतील ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांची बिनविरोध निवड जाहीर करताना.