शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात आयपीएलच्या केकेआर संघातील खेळाडूवर विनामास्कची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 17:17 IST

चारचाकी चालवणार्‍या के के आर संघाच्या राहुल त्रिपाठीवर ५०० रुपयांचा दंड

ठळक मुद्देकोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात त्रिपाठी सासवड येथून खडकी येथे जात असताना केली कारवाई

पुणे: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने मास्क घालणे बंधनकारक आहे. अभिनेते, दिग्गज व्यक्ती, राष्ट्रीय - आंतराराष्ट्रीय खेळाडू आणि सामान्य नागरिक कोणालाही यामध्ये सूट दिली जात नाही. एखादा व्यक्ती विनामास्क फिरताना दिसल्यास पोलिस थेट कारवाई करत आहे. आज दुपारच्या सुमारास पुण्यात के के आर संघाचा खेळाडू राहुल त्रिपाठी चारचाकी वाहनातून विनामास्क जात होता. त्यावेळी कोंढवा पोलिसांनी त्याच्यावर ५०० रूपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.

या कारवाई बद्दल कोंढवा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक संतोष सोनावणे म्हणाले की, कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आम्ही विनामास्क फिरणार्‍या नागरिकांवर कारवाई करत होतो. त्यावेळी चारचाकी वाहनातून एक व्यक्ती विना मास्क असल्याचे दिसून आले.

त्या व्यक्तीकडे चौकशी केली असता, ते सासवड येथून खडकी येथे जात होते. मी के के आर संघाकडून खेळत असून माझ नाव राहुल त्रिपाठी आहे. त्यावर आम्ही एकच म्हटले, आपणास दंड भरावा लागेल. त्यानंतर त्याने ५०० रुपयांचा दंड भरून घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेIPLआयपीएल २०२१corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसGovernmentसरकार