कपड्याच्या दुकानावर अज्ञाताचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:10 IST2021-04-10T04:10:33+5:302021-04-10T04:10:33+5:30

याबाबतची तक्रार युवराज बाळशीराम हुले ( रा.काठापुर ता.आंबेगाव ) यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे. युवराज हुले यांचे पारगाव ...

Unknown clutter at the clothing store | कपड्याच्या दुकानावर अज्ञाताचा डल्ला

कपड्याच्या दुकानावर अज्ञाताचा डल्ला

याबाबतची तक्रार युवराज बाळशीराम हुले ( रा.काठापुर ता.आंबेगाव ) यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.

युवराज हुले यांचे पारगाव येथे कपड्याचे दुकान असून दि.६ रोजी सायंकाळी सहा वाजता ते दुकान बंद करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांना दुकानाचा चोरी झाल्याचे समजले. ते आणि त्यांचा भाऊ हे दुकानावर गेले असता दुकानाचे शटर उचकटलेले व दरवाजाची काच फुटलेली त्यांना दिसली. त्यांनी दुकानात जाऊन पाहिले असता दुकानातील कपडे अस्ताव्यस्त पडलेली होती व त्यांनी कपडे मालाची तपासणी केली असता दुकानातील २० हजार रुपये किमतीच्या फॅन्सी जीन्स व २० हजार रुपये किमतीचे शर्ट ,टी शर्ट नाईट पॅन्ट ,असा एकूण ४० हजार रुपयाची कपडे चोरून नेल्याचे लक्षात आले.या चोरीतील चोरटे शेजारी असलेल्या किराणा मालाच्या दुकाना बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाले असून त्यांनी चेहऱ्यावर रुमाल बांधले आहेत.

Web Title: Unknown clutter at the clothing store