'शिववंश' पुस्तकातून उलगडणार शिवरायांची अपरिचित वंशशाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:11 IST2021-05-14T04:11:55+5:302021-05-14T04:11:55+5:30
गुरुवारी पत्रकार परिषदेत बांदल यांनी 'शिववंश' बाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, ''शिवाजी महाराजांना दोन मुले झाली. पहिले संभाजी ...

'शिववंश' पुस्तकातून उलगडणार शिवरायांची अपरिचित वंशशाखा
गुरुवारी पत्रकार परिषदेत बांदल यांनी 'शिववंश' बाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, ''शिवाजी महाराजांना दोन मुले झाली. पहिले संभाजी राजे आणि द्वितीय पुत्र म्हणजे राजाराम महाराज. संभाजी राजे यांचे दोन विवाह झाले. पहिला विवाह राजेशिर्के घराण्यातील येसूबाई यांच्याशी झाला. त्यांना शिवाजीराजे ऊर्फ शाहू यांचा जन्म झाला, हे सर्वश्रुत आहे. संभाजी राजे यांचा दुसरा विवाह जाधवराव घराण्यातील दुर्गाबाई यांच्यासोबत १८७५ साली झाला. हा विवाह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समक्ष झाला होता.''
''संभाजी राजे आणि दुर्गाबाई यांना दोन मुले आणि दोन मुले अशी चार अपत्ये झाली. मुलींच्या नावाबद्दल फारसा उल्लेख आढळून येत नाही. मुलांची नावे मदनसिंह आणि माधवसिंह अशी होती. संभाजी राजे यांच्या मृत्यूनंतर रायगड किल्ला पडाव झाला व राजकबिला कैदेत सापडला. त्यामध्ये शाहूराजे (थोरले), मदनसिंह, माधवसिंह, सकवारबाई, येसूबाई व दुर्गाबाई असल्याचा संदर्भ मिळतो. पुढे १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराज महाराष्ट्रात आले. त्यांनी १७१९ मध्ये दिल्ली मोहीम आखली आणि राजकबिल्याची सुटका केली. त्यामध्ये मदनसिंह यांचा समावेश होता. १६९८ मध्ये माधव सिंह यांचा मृत्यू झाला होता. मदन सिंह यांना सांभा सिंह आणि रूपसिंह अशी दोन अपत्ये होती. त्यांचाही उल्लेख शिवकालीन कागदपत्रांमध्ये आढळतो. या दोन्ही शाखांचा समग्र इतिहास आणि पुढील पिढ्यांचे विवेचन शिववंश या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे'', असे करणसिंह नाईक बांदल यांनी नमूद केले. कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर पुस्तकाचे प्रकाशन केले जाईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.