विद्यापीठाचा १११ वा पदवीप्रदान समारंभ रद्द

By Admin | Updated: May 10, 2017 03:57 IST2017-05-10T03:57:35+5:302017-05-10T03:57:35+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून येत्या ११ मे रोजी आयोजित ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये

University's 111th Graduation Awards canceled | विद्यापीठाचा १११ वा पदवीप्रदान समारंभ रद्द

विद्यापीठाचा १११ वा पदवीप्रदान समारंभ रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून येत्या ११ मे रोजी आयोजित ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेला १११ वा पदवीदान समारंभ अचानक रदद् करण्यात आला आहे. तांत्रिक कारणास्तव समारंभ रदद् करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कर्मचारी संघाने मंगळवारी सायंकाळी पत्रक काढून समारंभ उधळून लावण्याची धमकी दिली होती, यापार्श्वभुमीवर विद्यापीठाकडून समारंभच रदद् करण्यात आल्याचे चर्चा रंगली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) वर्षातून दोन वेळा पदवीदान समारंभ आयोजित करण्याचे निर्देश विद्यापीठांना दिले आहेत. त्यानुसार वर्षातील दुसरा पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा समारंभ ११ मे रोजी होणार असल्याची माहिती प्रभारी कुलसचिव अरविंद शाळीग्राम यांनी मंगळवारी दुपारी ५ वाजता पत्रकार परिषदेमध्ये दिली. त्यानंतर अवघ्या ३ तासांमध्ये हा पदवीदान समारंभ रदद् करण्याचे पत्रक विद्यापीठाच्यावतीने काढण्यात आले आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे ११ मे होणारा पदवीदान समारंभ स्थगित करण्यात आलेला असून पुढील पदवीदान समारंभाची माहिती नंतर जाहीर करण्यात येईल असे या पत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: University's 111th Graduation Awards canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.