शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
4
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
5
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
6
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
7
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
8
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
9
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
10
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
11
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
12
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
13
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
14
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
15
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
16
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
17
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
18
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
19
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
20
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश

विद्यापीठ घेणार पाच पुरग्रस्त गावे दत्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 07:00 IST

शासनाच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातर्फे पाच गावे दत्तक घेवून या गावांची पुन्हा उभारणी केली जाणार आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या मदतीने गावांमध्ये राबविणार स्वच्छता मोहीम

पुणे : अतिवृष्टी व पुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील काही गावे उद्ध्वस्त झाली असून पुरामुळे बहुतांश गावांमध्ये अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळेच सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाने या गावांना पुन्हा उभे करण्यासाठी व पुरग्रस्तांना मानसिक दिलासा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शासनाच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातर्फे पाच गावे दत्तक घेवून या गावांची पुन्हा उभारणी केली जाणार आहे. तसेच या उपक्रमात शिक्षण क्षेत्राशी निगडित असणाऱ्या सर्व घटकांना सामावून घेतले जाणार आहे.कोल्हापूर व सांगलीतील नदीकाठच्या गावांसह शहरातीलकाही भागांला सुध्दा पुराचा मोठा फटका बसला. सुमारे आठवडा भरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे नागरिकांना आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागले. परंतु, योग्यवेळी सुरक्षित स्थळावर पोहचू न शकल्यामुळे पुराच्या पाण्यात ४० हून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले. सध्या पुरपरिस्थिती निवळत असली तरी काही भागात अजूनही पाणी साचलेले आहे. राज्यातील सर्वच भागातून  पुरग्रस्तांसाठी पिण्याचे पाणी, बिस्किट, भाकरी, कपडे, अशा जीवनोपयोगी वस्तूंच्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मात्र, लोकांना मानसिक आधार देण्याची व गाव स्वच्छ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पाच गावे दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे म्हणाले, पुरामुळे नुकसान झालेल्या गावांना पुन्हा उभे करणे गरजेचे आहे. तसेच पुरामुळे गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली असून परिसरात रोगराई पसरण्याची भिती आहे. सध्या पुरग्रस्तांना विविध भागातून वस्तू रुपात मदत येत आहे. परंतु, विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मदतीने पुरग्रस्त गावांमध्ये स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार विद्यापीठाकडून पाच गावे दत्तक घेतली जातील. तसेच शासनाकडून राबविल्या जाणाºया पुनर्उभारणीच्या कामात विद्यापीठाचे विद्यार्थी सहभाग घेतील.

..............सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी पाच गावे दत्तक घेण्यास मंजुरी दिली आहे. प्राध्यापक, प्राचार्य संघटना, संस्थाचालक, विद्यापीठाच्या अधिकार मंडळाचे सर्व सदस्य या सर्वांशी चर्चा करून विद्यापीठातर्फे पुरग्रस्त गावांच्या पुनर्उभारणीचे काम करण्यात येईल. तसेच लवकरच याबाबतची सविस्तर माहिती स्पष्ट केली जाईल.- राजेश पांडे,व्यवस्थापन परिषद सदस्य,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठfloodपूर