मराठी विद्यार्थ्यांचा विद्यापीठाला विसर?
By Admin | Updated: March 30, 2015 05:33 IST2015-03-30T05:33:07+5:302015-03-30T05:33:07+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बहिस्थ: विद्यार्थ्यांच्या वाढीव शुल्कच्या बदल्यात अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला खरा, त्यानुसार प्रथम वर्ष कला

मराठी विद्यार्थ्यांचा विद्यापीठाला विसर?
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बहिस्थ: विद्यार्थ्यांच्या वाढीव शुल्कच्या बदल्यात अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला खरा, त्यानुसार प्रथम वर्ष कला व वाणिज्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्यही उपलब्ध करून दिले. परंतु, परीक्षा तोंडावर आलेल्या असताना अद्याप प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना
मराठीतील अभ्यास साहित्यच उपलब्ध करून दिलेले नाही. त्यामुळे विद्यापीठाला मराठीच्या विद्यार्थ्यांचा विसर पडला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
बहिस्थ: विद्यार्थ्यांची शुल्क वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे काही अधिसभा सदस्यांनी विरोध केला.परंतु, त्या बदल्यात अभ्यास साहित्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याने विद्यापीठाने केलेली शुल्कवाढ बरोबर असल्याचे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले. मात्र, प्रथम वर्ष बी.कॉमचे फंडामेंटल बँकिंग विषयाचे मराठी व इंग्रजीतील अभ्यास साहित्य तसेच बी.ए. व बी.कॉमचे हिंदी व इंग्रजी विषयाचे साहित्य वगळता इतर कोणत्याही विषयाचे सहित्य उपलब्ध करून दिलेले नाही.परीक्षा तोंडावर आलेल्या असताना विद्यार्थ्यांना अद्याप अनेक विषयांचे साहित्य उपलब्ध झालेले नाही. (प्रतिनिधी)