हिंदु-मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:15 IST2021-08-20T04:15:50+5:302021-08-20T04:15:50+5:30

माळेगाव : माळेगाव येथील हिंदू-मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे प्रतिपादन सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी ...

Unity of Hindu-Muslim brothers | हिंदु-मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचा

हिंदु-मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचा

माळेगाव : माळेगाव येथील हिंदू-मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे प्रतिपादन सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी केले.

मोहरमनिमित्त कोरोना संसर्गाचा नायनाट होऊन भरपूर पाऊस पडावा यासाठी हिंदू मुस्लिम बांधवांनी सामूहिक प्रार्थना केली. मोहरमनिमित्त नगरपंचायत माळेगाव व परिसरात मानाचा पहिला ताबूत हजरत पीर राजेबागसवार दग्यार्चा फकीर गुलाब इनामदार, मानाचा दुसरा ताबूत मस्जिद येथील शार्गिद शेख, मानाचा तिसरा ताबूत पेठकरी यांचा माजी उपसरपंच अजित तांबोळी व मानाचा चौथा ताबूत नवसाचा हिंदू बांधव किसन कामठे यांच्या ताबुतांची स्थापना करण्यात आली.

मानाच्या पहिल्या पीर दर्गा येथील ताबुताचे पुजन सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते व माजी सभापती संजय भोसले यांनी केले. या वेळी गुलाब फकीर व शाहरुख इनामदार यांनी फातेह पठण केले. या वेळी माजी उपसरपंच अजित तांबोळी, रिपाई तालुका युवाध्यक्ष विश्वास भोसले, पोलीस हवालदार रावसाहेब गायकवाड, योगेश चितारे, नेहाल भोसले, दादा सोनवणे, मयूर भोसले, तरबेज शेख,पिंटु गव्हाणे,हेमंत कोकरे आदी उपस्थित होते.

--

फोटो ओळी- नगरपंचायत माळेगावमधील मानाच्या पहिल्या पीरदर्गा ताबुताचे पूजन करताना सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते व माजी सभापती संजय भोसले.

१९०८२०२१-बारामती-०६

————————————————

Web Title: Unity of Hindu-Muslim brothers