शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

''देह देवाचे मंदिर '' पुण्यातील कुलकर्णी काकांचा अनाेखा देखावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 20:36 IST

देव देहाचे मंदिर या अभंगाचा आधार घेत पुण्यातील कुरकर्णी काका यांनी अनाेखा देखावा साकारला आहे.

पुणे :  देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर |          जशी उसात हाे साखर तसा देहात हाे इश्वर |           जसे दुधामध्ये लाेणी तसा देही चक्रपाणि |           देव देहात देहात काे हाे जाता देवळात |          तुका सांगे मूढ जना देही देव का पहाना |संत तुकाराम महाराजांचा हा अभंग. या अभंगातून प्रेरणा घेत पुण्यातील संजीव कुलकर्णी यांनी त्यांच्या घरात अनाेखा देखावा तयार केला आहे. या देखाव्यामध्ये आपल्यामध्ये असणाऱ्या देवाचा शाेध घेण्याचा संदेश त्यांनी दिला आहे. 

पुण्यातील 60 वर्षीय संजीव कुलकर्णी हे कुलकर्णी काका या नावाने प्रसिद्ध आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते त्यांच्या घरात आकर्षक असे देखावे तयार करत असतात. गेल्या वर्षी त्यांनी एटीएमचा देखावा तयार केला हाेता. ज्यात एटीएममधून प्रसाद मिळत असे. यंदा काहीतरी वेगळं करण्यासाठी आपल्यातील देव प्रत्येकाने ओळखावा हा संदेश त्यांनी तुकारामांच्या अभंगाचा आधार घेत दिला. या देखाव्यामध्ये त्यांनी एक वडाचे झाड साकारले असून त्यासमाेर एका व्यक्तीची प्रतिकृती तयार केली आहे. या प्रतिकृतीच्या ह्रदयामध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. त्याचबराेबर ऊसामधून साखर कशी येते हेही त्यांनी यात दाखवले आहे. 

गेल्या 6 महिन्यांपासून कुलकर्णी काका या देखाव्याची तयारी करत हाेते. या देखाव्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी जात देखाव्यासाठी लागणाऱ्या वस्तू मिळवल्या. देखावा तयार करण्यासाठी त्यांना 15 हजार रुपयांचा खर्च आला. देखावा तयार करण्यासाठी त्यांना त्यांच्या पत्नी स्वाती कुलकर्णी त्यांच्या बहीण ललिता कुलकर्णी आणि त्यांचा मुलगा सर्वेश कुलकर्णी यांनी माेलाची मदत केली. 

या देखाव्याबाबत बाेलताना कुलकर्णी काका म्हणाले, आपल्या देहामध्ये देव आहे त्यासाठी दुसरीकडे जाण्याची गरज नाही. प्रत्येक माणसामध्ये आपण देव पाहायला हवा. हाच संदेश या देखाव्यातून देण्याचा प्रयत्न आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या देखाव्यासाठी मी तयारी करत हाेताे. अनेक अडचणी आल्या परंतु त्यांच्यावर मात करत हा देखावा तयार केला. देव आपल्यामध्येच समाविष्ट आहे. आपण त्याप्रमाणे वागायची गरज आहे. 

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेश महोत्सवganpatiगणपती