चितेवर झोपून नगरसेवकाचे अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:09 IST2021-03-06T04:09:59+5:302021-03-06T04:09:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खराडी गावातील स्मशानभूमीचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. मरणानंतर अग्नी देण्यासाठी स्मशानातील ...

A unique movement of a corporator sleeping on a leopard | चितेवर झोपून नगरसेवकाचे अनोखे आंदोलन

चितेवर झोपून नगरसेवकाचे अनोखे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : खराडी गावातील स्मशानभूमीचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. मरणानंतर अग्नी देण्यासाठी स्मशानातील चितादेखील खराडीवासीयांच्या नशिबी नसल्याची गंभीर स्थिती आहे. याच्या निषेधार्थ प्रभाग क्रमांक चारचे नगरसेवक भय्यासाहेब जाधव यांनी चितेवर झोपण्याचे आंदोलन करत या प्रश्नाचे गांभीर्य प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला.

नगरसेवक जाधव म्हणाले की, तुटपुंज्या बजेटसाठी खराडी चंदननगरच्या नागरिकांची मृत्यूनंतरही अव्हेलना सुरू आहे. खराडी परिसरातील मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार रस्त्यावरच करावे लागत आहेत. यामुळे नागरिक नाराज आहेत. अनेक वेळा निवेदन दिले आहे. मात्र केवळ आश्वासन मिळते. चालूच आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच भयानक होती. काही शव जळत असतानाच अचानक आलेल्या पावसाने पर्याय शोधण्याची वेळ नागरिकांवर येते.

चितेवर जिवंतपणी झोपून निषेध नोंदविण्याशिवाय दुसरा पर्याय प्रशासनाने ठेवला नाही. विरोधी पक्षाचा नगरसेवक असल्याने हीन वागणूक सहन करीत आलो आहोत, मात्र रस्त्यावर शव जाळण्याइतकी वाईट वेळ फक्त प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आली, असा आरोप जाधव यांनी केला.

Web Title: A unique movement of a corporator sleeping on a leopard