शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीची छेडछाड;उदय सामंत म्हणाले,'पोलिसांनी मवाळ भूमिका न घेता जहाल भूमिका घ्यावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 18:24 IST

या प्रकरणातील आरोपींवर पोलिसांनी कडक कायदेशीर कारवाई करावी. पोलिसांनी मवाळ भूमिका न घेता जहाल भूमिका घ्यावी.

आळंदी : केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या महाराष्ट्रातील भाजपच्या महिला नेत्याच्या मुलीसह अन्य काही मुलींची यात्रेदरम्यान टवाळखोरांनी छेडछाड केली. या घटनेबाबत दोन दिवसांपूर्वी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र कारवाई न झाल्याने स्वतः सदर केंद्रीय मंत्र्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला.यावर आज आळंदीत माध्यमांशी बोलतांना मंत्री उदय सामंत यांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणातील आरोपींवर पोलिसांनी कडक कायदेशीर कारवाई करावी. पोलिसांनी मवाळ भूमिका न घेता जहाल भूमिका घ्यावी. अशी प्रवृत्ती ठेचून काढाव्यात. छेडछाडीचे प्रकार घडत असतील तर पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे. असं म्हणत सामंत यांनी माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केला.दरम्यान, तीर्थक्षेत्र आळंदीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सव वर्ष ७५० वे या निमित्ताने “ओळख श्री ज्ञानेश्वरीची” या पुस्तक प्रकाशन सोहळ्या निमित्त मंत्री उदय सामंत यांनी हजेरी लावली.  उदय सामंत इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना इंद्रायणी आणि पवना नदी प्रदूषण मुक्त करण्याबाबत माझ्यावर जबाबदारी दिली होती. त्याबाबतचा डीपीआर तयार करायला सुरुवात केली आहे. एमआयडीसी, पर्यावरण विभाग, एमआरडीए, पीसीएमसी आणि पीएमसी आहे. या सगळ्यांच्या सहभागाने दोन ते अडीच हजार कोटींचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण होईल.'एकनाथ खडसेंचा संताप: “पोलीस असतानाही गुंडांचा धाक”या घटनेवर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “मुक्ताईनगरमध्ये घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे. या गुंडांवर आधीच गुन्हे दाखल आहेत. यात्रेत उपस्थित असलेल्या पोलिसांनाही मारहाण करण्यात आली. मग महिलांची सुरक्षा कशी राहणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीAlandiआळंदीraksha khadseरक्षा खडसेPoliceपोलिस