शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

केंद्रीय मंत्र्यांच्या कर्मचाऱ्याला गजानन मारणेच्या गुंडांकडून मारहाण; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मुख्यमंत्र्यांनी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 14:37 IST

पुण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कर्मचाऱ्याला कुख्यात गुंडांच्या टोळीकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.

Pune Crime: पुण्यात गुन्हेगारीच्या घटना थांबवण्याचे नाव घेत नाहीये. पोलिसांकडून कडक कारवाई होत असली तरी पुण्यातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनला आहे. अशातच पुण्यात आता केंद्रीय मंत्र्यांच्या कर्मचाऱ्यावरही कुख्यात गुंडाच्या टोळीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे आता सामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुंड गजानन मारणे टोळीतील गुंडांनी केंद्रीय नागरी उद्यान मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जवळच्या व्यक्तीला  मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरुनच खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाती कर्मचाऱ्याला कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या टोळीतील गुंडांनी क्षुल्लक कारणावरुन मारहाण केली. कोथरूड भागात गाडीचा धक्का लागल्याच्या वादातून मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात सोशल मीडियाचं काम पाहणाऱ्या देवेंद्र जोग यांना मारहाण करण्यात आली. या सगळ्या घटनेवरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात  केंद्रीय मंत्र्यांचे निकटवर्तीय देखील सुरक्षित नसल्याचे म्हटलं आहे.

"पुणे शहरात केंद्रीय मंत्री महोदयांचे निकटवर्तीय देखील सुरक्षित नाहीत. कुख्यात गुंडाने पुण्यातील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या स्टाफमधील काही कर्मचाऱ्यांवर हल्ला करून जखमी केले. केंद्रीय मंत्रीमहोदयांची ही अवस्था तर सर्वसामान्य जनतेचे काय हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. गेली‌ काही दिवस पुण्यात गुंडांनी उच्छाद मांडला आहे.‌ भररस्त्यतात रिव्हॉल्व्हर काढणे, हाणामारी प्रकार नेहमीच घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी यात तातडीने लक्ष घालून शहराची कायदे सुव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करतो," असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

शिवजयंतीच्या दिवशी कोथरूड परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणूक निघाली होती. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे काम करणारे देवेंद्र जोग हे कोथरूड भागातील भेलके नगर परिसरातून दुचाकीवरून निघाले असता गजानन मारणे टोळीतील सदस्यांनी त्यांच्या गाडीला कट मारला. त्यावेळी गाडीमध्ये बाबू पवार, किरण पडवळ, ओम तीर्थराम आणि अमोल तापकीर हे चौघे होते. कट मारल्याने देवेंद्र जोग यांनी चौघा जणांकडे रागाने बघितलं. याचाच राग आल्याने चौघांनी मिळून देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत  जोग यांच्या नाकाला नाकाला गंभीर दुखापत झाली असून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये चौघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांपैकी तीन आरोपींना कोथरूड पोलिसांकडून अटक केली आहे. तर एकजण अद्याप फरार आहे. दुसरीकडे, या घटनेनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्हिडीओ कॉल करून देवेंद्र जोग यांची विचारपूस केल्याचे म्हटलं जात आहे.

टॅग्स :Puneपुणेmurlidhar moholमुरलीधर मोहोळSupriya Suleसुप्रिया सुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस