शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
3
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
4
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
5
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
6
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
7
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
8
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...
9
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
10
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
11
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
12
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
13
रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार; गुंगीचं इंजेक्शन दिलं अन्...
14
कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
15
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
16
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
17
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
18
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
19
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
20
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता

पुण्यातील शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 18:51 IST

रविवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता हा लोकार्पण सोहळा आंबेगाव येथे होणार आहे.

पुणे : पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या पुणे शिवसृष्टीच्या प्रथम चरणाच्या लोकार्पण सोहळ्याला अमित शहा हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. रविवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता हा लोकार्पण सोहळा आंबेगाव येथे होणार आहे.

पुणे हे राज्याचे सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक व आयटी केंद्र आहे. त्यामुळे पुण्यात आंतरराष्ट्रीय व्यक्ती येतात. पुण्यात येणार्‍या व्यक्तीला शनिवारवाडा, केळकर वस्तुसंग्रहालय, सिंहगड इत्यादी पर्यटन केंद्रे उपलब्ध आहेत. त्यात आता शिवसृष्टीची भर पडणारा आहे. या प्रकल्पातून शिवचरित्र साकारताना ते जागतिक कीर्तीचे असणार आहे. महाराजांच्या जीवनातील असंख्य प्रसंग आहेत. ज्यातून कायम प्रेरणा मिळत राहते. असे अनेक प्रसंग आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने साकार केले जाणार आहेत. शिवाजी महाराजांची रायगडावरील राजसभेची प्रतिकृती (65 हजार चौरस फूट) येथ साकारण्यात येणार आहे. प्रतापगडावरील भवानी मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार असून तेथेच महाराष्ट्रातील प्रमुख देवतांच्या मंदिराच्या प्रतिकृती असणार आहेत. तसेच शिवसृष्टीमध्ये एक रंगमंच निर्माण करण्यात येणार असून त्यात महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून (व्हर्च्युअल रियालिटी) साकार होणार आहेत - उदा., आग्य्राहून सुटका, पावनखिंडीतील लढाई, महाराजांचे आरमार इत्यादी गोष्टींबरोबरच राजमाचीवरील तोफेचा अनुभव शिवभक्तांना घेता येणार आहे. महाराजांची दूरदृष्टी आणि नीती यांचे दर्शन घडवणारे अनेक प्रसंग, घटना शिवसृष्टीमध्ये समाविष्ट असणार आहेत.

टॅग्स :Amit Shahअमित शाहSocialसामाजिकBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज