शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

आर्मीच्या वेशातील अज्ञात व्यक्तीकडून वानवडीत धुमाकूळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 15:05 IST

ही अज्ञात व्यक्ती रात्री ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास गावातील कोणाच्याही घरात घुसत आहे.

ठळक मुद्देवानवडीत भितीचे वातावरण , रात्री येईना झोप.. 

पुणे : वानवडी परिसरात आर्मी वेशभूषा असलेली एक अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेळी कोणाच्याही घरात घुसत असल्याने वानवडी गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत गावातील नागरिक दिनेश सामल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्मीचे कपडे घातलेला ६ ते ६.५ फुट उंच व्यक्ती सोमवारी रात्री भोसले वाडा येथे दिसला होता. दोन दिवसापूर्वी असाच प्रकार आबनावे वाडा येथे घडला होता व पंधरा दिवसापूर्वी भैरोबा मार्ग ४ नंबर बंगला येथे एका घरात हीच आर्मी वेशातील व्यक्ती घुसली.ही अज्ञात व्यक्ती रात्री ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास गावातील कोणाच्याही घरात घुसत आहे. तो भिंतीवरुन उड्या मारत मध्येच कोठेतरी गायब होत आहे. घरात घुसुन स्रियांच्या, मुलींच्या बाजूला झोपत असल्याने वानवडीत भितीचे वातावरण झाले असून नागरिकांना रात्रीची झोप लागत नाही. कोणतीही चोरीची किंवा विनयभंगाची, मारहाणीची घटना या व्यक्तीकडुन झाली नसली तरी ही व्यक्ती चोर आहे असा गावकऱ्यांचा समज आहे तसेच पुढे काही विपरीत परिणाम घडण्याच्या अगोदर या व्यक्तीला पकडणे गरजेचे आहे. गावकरी व दिनेश सामल यांनी वानवडी बाजार पोलिसांना सांगितले असता वानवडी पोलिसांकडून सोमवारी रात्री या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात झाली परंतु ही व्यक्ती कोठेही सापडली नसल्याने पोलिसांकडून तपास कार्य सुरु आहे तसेच कोणालाही ही आर्मी वेषातील ६ फुट उंच व्यक्ती आढळल्यास वानवडी पोलिसांना कळवावे व शक्य असल्यास पोलीस येईपर्यंत त्या व्यक्तीला पकडण्याचे आवाहन वानवडी पोलीसांनी केले आहे.

अज्ञात व्यक्ती येडसर असल्याचा संशय.. वानवडी भागात पूर्वी दोन वेडसर व्यक्ती होत्या. ते सुद्धा आर्मी कपडे परिधान करत असत त्या व्यक्तींना पोलिसांनी समज दिली होती. कालांतराने हे दोन व्यक्ती बेपत्ता होते. त्यातील एक वेडसर व्यक्ती असाच उंच होता त्यामुळे त्या दोन व्यक्ती मधील ही अज्ञात व्यक्ती असल्याचा संशय वानवडी बाजार पोलीस चौकीचे उपनिरीक्षक आत्माराम शेटे यांनी व्यक्त केला आहे. अज्ञात व्यक्तीचा तपास सुरु असल्याचे वानवडी पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :WanvadiवानवडीPoliceपोलिस