वाहनतळाबाबत उदासीनच

By Admin | Updated: April 11, 2015 05:17 IST2015-04-11T05:17:23+5:302015-04-11T05:17:23+5:30

बेस्ट सिटी म्हणून नावलौकिक मिळविलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारत परिसरात वाहनतळाची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे.

Unhappy about parking | वाहनतळाबाबत उदासीनच

वाहनतळाबाबत उदासीनच

सुवर्णा नवले, पिंपरी
बेस्ट सिटी म्हणून नावलौकिक मिळविलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारत परिसरात वाहनतळाची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. कर्मचारी, नगरसदस्य, अधिकारी वर्गापर्यंत चारचाकी व दुचाकीने पालिकेचा सर्व परिसर वाहनांनीच व्यापला जात आहे. महापालिकेत दहा हजारांच्या वर वाहनांची दैनंदिन ये-जा होत आहे. कित्येक निविदा भरूनही अद्यापपर्यंत पालिकेच्या वाहनांसाठी कोणतीही तरतूद नसल्याचे लोकमत पाहणीत समोर आले आहे.
सर्वसाधारण सभा व स्थायी समिती सभेदिवशी वाहनतळाची समस्या तीव्रतेने जाणवत आहे. दुचाकी व चारचाकीसाठी वाहनतळ अपुरे पडत आहे. वाहने लावण्यावरून कार्यकर्ते पुरेशा जागेअभावी सुरक्षा कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करतात. सुरक्षा कर्मचाऱ्यांना पदाधिकाऱ्यांसह नागरिकांची अरेरावी सहन करावी लागत आहे. पार्किंगचे काम नसतानाही या कामाचा त्रास सुरक्षारक्षकांना होत आहे. महापालिकेकडे वाहनतळासाठी पुरेशी जागा कधी उपलब्ध होणार, हा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
महापालिकेच्या दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी अधिकाऱ्यांकरिता मुंबई-पुणे महामार्गाच्या डाव्या बाजूला ५ हजार चौरस फूट जागा महापालिकेसमोर वाहनतळ उपलब्ध करुन दिले आहे. मात्र, दुचाकी व चारचाकी वाहने लावण्यास पदाधिकारी अनुत्साही असल्याचे दिसत आहे. ही जागा वापराविना पडून आहे. याकरिता ग्रेड सेपरेटरवरून पालिकेत वाहनांतळकरिता पूल असणे गरजेचे आहे. महापालिकेला चारही बाजूंनी वेढले वाहनांनी
मुंबई-पुणे महामार्गालगत रस्तारुंदीकरणाचे, बीआरटीएसचे काम सुरू आहे. यामुळे दुचाकी लावण्यासाठी असणारी जागा कमी पडत आहे. महापालिका प्रवेशद्वार ते बाहेर पडण्याच्या मार्गापर्यंत वाहनांची कोंडी दिसून येत आहे. महापालिकेला चारही बाजूंनी वाहनांनी वेढलेले आहे. गाड्या अस्ताव्यस्त लावल्यामुळे याचा त्रास सर्वांना सहन करावा लागत आहे. वाहने खचाखच लावली जातात. यामुळे वाहनांचे काही भाग निखळले जात आहेत.

Web Title: Unhappy about parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.