ससूनमधील समस्यांची अनपेक्षित पाहणी
By Admin | Updated: January 1, 2015 01:13 IST2015-01-01T01:13:25+5:302015-01-01T01:13:25+5:30
ससून रुग्णालयाची आजही तीच समस्या आणि तेच तेच काम कधी होणार, याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या ससून रुग्णालयाच्या समस्यांची पाहणी आमदार जगदीश मुळीक यांनी केली.

ससूनमधील समस्यांची अनपेक्षित पाहणी
वडाावशेरी : अनेक कारणांनी चर्चेत राहणाऱ्या ससून रुग्णालयाची आजही तीच समस्या आणि तेच तेच काम कधी होणार, याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या ससून रुग्णालयाच्या समस्यांची पाहणी आमदार जगदीश मुळीक यांनी केली.
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार जगदीश मुळीक यांनी नुकत्यात झालेल्या अधिवेशात ससूनच्या समस्यांचा प्रश्न उपस्थित केला. पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या शासकीय रुग्णालयाच्या कारभाराचा प्रश्न उपस्थित केला होता.
अधिवेशनात आमदार जगदीश मुळीक यांनी प्रश्न उपस्थित केला व वैद्यकीय आरोग्यमंत्री विनोद तावडे यांनी ससून रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन समस्या, काही प्रमणात
होणारा भ्रष्टाचार यांची पाहणी करणार असल्याचे आश्वासन दिले होते.
आज आमदार मुळीक यांनी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना न देताच ससून गाठले व रुग्णालयाची पाहणी केली. त्यामुळे अधिकाऱ्यांची धावधाव सुरू झाली.
आमदार मुळीक यांनी समक्ष पाहणी केल्या असता प्रमाणापेक्षा ससून अवस्था अतिशय नाजूक झाल्याचे आढळून आले.
या वेळी ससूनचे अधीक्षक डॉ. अजय चंदनवाले, सिव्हील सर्जन दिलीप कुलकर्णी, लोहगावचे उपसरपंच संतोष खांदवे, अनिल मुलीया, चंद्रकांत सूर्यवंशी, विकास भातकर, संतोष घोलप या वेळी उपस्थित होते. (वार्ताहर)
४ससूनचा अतिशय ढिसाळ कारभार असून, ड्रेनेजचे पाणी सर्वत्र पसरलेले, पाणी वाहणाऱ्या नलीका तुटलेल्या, त्यातून गळणारे पाणी, स्वच्छतागृहांची झालेली दुदर्शा,त्याची दुर्गंधी सर्वत्र रुग्णालयात पसरलेली. सुरक्षारक्षक अपुरे, अनेक कर्मचारी नेहमी सुटीवर राहणे, रुग्णांची होणारी हेळसांड, झालेली दुर्दशा,वाट पाहणाऱ्या रुग्णांसाठी बाकडे नसल्याने नागरिकांना जमिनीवर बसवे लागते. विविध तपासणी करण्यासाठी लागणाऱ्या लॅबची झालेली दुर्दशा, आयसीयूमध्ये अस्वच्छता, रुग्णालयाच्या आवरात पसरलेला राडारोडा, एक्सरे मशीन बंद, कचरा, अशा प्रकारच्या समस्यांचा अनुभव मुळीक यांनी घेतला.