उंडवडी सुपेत एकही कोरोनाबाधित नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:08 IST2021-05-29T04:08:53+5:302021-05-29T04:08:53+5:30
उंडवडी सुपे येथील आरोग्य केंद्रात गुरुवार दि. २७ रोजी गावातील संशयित आणि सुपर स्प्रेडर नागरिकांची अँटिजेन टेस्ट तालुका अधिकारी ...

उंडवडी सुपेत एकही कोरोनाबाधित नाही
उंडवडी सुपे येथील आरोग्य केंद्रात गुरुवार दि. २७ रोजी गावातील संशयित आणि सुपर स्प्रेडर नागरिकांची अँटिजेन टेस्ट तालुका अधिकारी डॉ. मनोज खोमणे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात होती. यात ४१ नागरिकांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये अँटिजेन टेस्ट केलेल्या सर्व नागरिकांचे रिपोट निगेटिव्ह आले आहेत. कोरोना सर्वेक्षण योग्य होत असल्यामुळे एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नसल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत पवार यांनी दिली. या वेळी सहायक अधिकारी विजय मोरे, महेश रुद्राक्षी, शिवाजी कोथमिरे, उदयकुमार देशमुख, ज्योती पाचंग्रे, लता लोंढे, ग्रामसेवक विनोद आटोळे, सरपंच शोभा कांबळे, कुंडलिक कुचेकर आदी उपस्थित होते.
—————————————————
उंडवडी सुपे येथील आरोग्य केंद्रात नागरिकांची अँटिजेन टेस्ट तपासणी करण्यात आली.
२८०५२०२१-बारामती-०५