टेलिफोन सेवेचा बेशिस्त कारभार

By Admin | Updated: September 10, 2014 00:24 IST2014-09-10T00:24:34+5:302014-09-10T00:24:34+5:30

ग्रामीण व शहरी भागाला वरदान ठरलेली एकेकाळची बीएसएनएलची सेवा ही दिवसेंदिवस डबघाईला आलेली असल्याचे दिसून येत आहे

Undertaking of telephone service | टेलिफोन सेवेचा बेशिस्त कारभार

टेलिफोन सेवेचा बेशिस्त कारभार

सासवड : ग्रामीण व शहरी भागाला वरदान ठरलेली एकेकाळची बीएसएनएलची सेवा ही दिवसेंदिवस डबघाईला आलेली असल्याचे दिसून येत आहे.
ज्या सासवड शहरात पूर्वी हजारो टेलिफोन चालू होते तेथे आता केवळ शासकीय कार्यालय व शहरात प्रत्येक भागात केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील येवढेच टेलिफोन फोन राहीले असल्याचे दिसून येते. हे केवळ जनतेला न मिळणाऱ्या सोईमुळे झाले आहे. शहरातील दोनदोन दिवस टेलिफोनची सेवा विस्कळीत होत असल्याने टेलिफोनचे नवीन कनेक्शन घेणारे कमी झाले आहेत. तर जे काही चालू आहेत त्यांना ही वेळेवर सेवा मिळत नाही. रस्त्याच्या कडेला टेलिफोन कर्मचाऱ्यानी काम करण्यासाठी खादून ठेवलेले ठिकठिकाणी खड्डे व काम आपूरे असल्याने उघडया पडलेल्या टेलिफोनच्या वायरी हे चित्र सासवड शहरात दिसून येत आहे तर ग्रामीण भागात कसे असेल. यासर्व कारणामुळे जनतेने बीएसएनएल सेवेकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले आहे. जास्तीत जास्त टेलिफोनचे ग्राहक असणाऱ्या ग्राहकांनी आता इतर कंपण्यांच्या सुविधाकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: Undertaking of telephone service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.