शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

ओढ्यातील भूयारी मार्ग केल्यास रस्त्यावर उतरू : राष्ट्रवादी कॉग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 20:00 IST

आमदाराने काडीचेही काम आमच्या भागत केलेले नाही, पर्यायी रस्ते नसताना ओढ्यावर भुयारी मार्ग करण्याचा घाट यांनी घातला आहे. या ठिकाणी पावसाच्या पाण्याने पूर येऊन दुर्घटना होऊ शकते. याकडे मात्र आमदारांनी दुर्लक्ष केले आहे.

ठळक मुद्देश्रेयाच्या वादात अडकला भूयारी मार्गविधानसभा निवडणुकाजवळ आल्याने नागरिकांची ही अशी फसवणूक सुरू वाहतूक कोंडीचा प्रश्न हा हांडेवाडी रस्त्याचे रुंदीकरण आणि गेटजवळ भुयारी मार्ग करून सुटणारभुयारी मार्गासाठी अशी २ कोटी ४० लाख रुपये मंजूर

हडपसर : आमदारांच्या चुकीच्या ठिकाणी भुयारी मार्गांच्या कामाचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला आहे, भूयारी  मार्गला विरोध करण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी फारूक इनामदार यांनी दिला. भाजप आमदार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंग वरील वाहतूक कोंडी सुटण्याकरिता दोन भुयारी मार्ग ओढ्याच्या ठिकाणी करणार असल्याची माहिती दिली, यावर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक फारूक यांनी आमदार योगेश टिळेकर यांच्यावर आरोप करून भाजपच्या श्रेयाच्या राजकारणात भुयारी मार्ग रखडल्याचे सांगितले. ओढ्याच्या ठिकाणी दोन्ही भुयारी मार्गाचे भाजप आमदारांचे नियोजन आहे, पण या ठिकाणी पावसाळ्यातील पाणी जाण्याचे काहीच नियोजन नाही, पर्यायी रस्ते सक्षम उपलब्ध नाहीत. रवी पार्क जवळ डीपी रस्त्यावर घरे आहेत,त्यांचे स्थलांतर नाही, २ कोटी रुपये वाया गेले हा आमदार टिळेकर यांचा दावा चुकीचा असून या पैशात पावसाळी गटारे लाईन टाकून घेतली आहेत. भाजपने जनतेला उड्डाणपुलाचे गाजर दाखवत या भुयारी मार्गास विरोध केला.  गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना सत्ताधाऱ्यांना ४ वर्षात काही करता आले नाही. आता निवडणुक जवळ आल्याने, लोकांसमोर कसे जायचे या विचाराने आता नागरिकांची दिशाभूल सुरू आहे, पर्यायी रस्ते आम्ही केले, एकेरी रस्ता आम्ही आमच्या जागेतून केला. आमदाराने काडीचेही काम आमच्या भागत केलेले नाही, पर्यायी रस्ते नसताना ओढ्यावर भुयारी मार्ग करण्याचा घाट यांनी घातला आहे. या ठिकाणी पावसाच्या पाण्याने पूर येऊन दुर्घटना होऊ शकते. याकडे मात्र आमदारांनी दुर्लक्ष केले आहे. भुयारी मार्गासाठी अशी २ कोटी ४० लाख रुपये मंजूर झाले होते. जून २०१३ मध्यें ३७ कोटी ९ लाख ७१ हजार रुपयांचा निधी  माझ्या  व नगरसेविका वैशाली बनकर यांच्या प्रयत्नातून झालेला आहे. आम्हाला श्रेय मिळेल म्हणून मेन गेटवरील भुयारी मार्ग रद्द ओढ्याच्या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याचा घाट आमदारांकडून घातला जात आहे.हांडेवाडी रस्त्यावर भुयारी मार्ग करण्याकरिता अवघ्या १६ मिळकती बाधित होत असताना भाजप आमदारांनी १८५ कुटुंब बाधित होईल ही दिशाभूल करण्यासाठी खोटी माहिती दिली. सरकारी रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याऐवजी आमदारांनी हा प्रश्न बिकट करून ठेवला. आता विधानसभा निवडणुकाजवळ आल्याने नागरिकांची ही अशी फसवणूक सुरू आहे. रामटेकडीला जाण्याकरिता रस्ता नसताना भुयारी मार्ग करून काही फायदा होणार नाही. मूळ वाहतूक कोंडीचा प्रश्न हा हांडेवाडी रस्त्याचे रुंदीकरण आणि गेटजवळ भुयारी मार्ग करून सुटणार आहे. ही वस्तुस्थिती असताना आमदार मात्र, अभ्यास न करता बिनकामाच्या या विकास योजना राबवत आहेत.यावेळी प्रणयराजे भोसले, बाळासाहेब ससाणे, जब्बार पठाण, सुफियान इनामदार आदी उपस्थित होते. 

टॅग्स :HadapsarहडपसरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा