राज्यात शिक्षकांची जिल्हा अंतर्गत,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST2021-06-09T04:12:56+5:302021-06-09T04:12:56+5:30

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही बारामती : राज्यातील प्राथमिक शिक्षकांची ३० जूननंतर जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ...

Under the teachers' district in the state, | राज्यात शिक्षकांची जिल्हा अंतर्गत,

राज्यात शिक्षकांची जिल्हा अंतर्गत,

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

बारामती : राज्यातील प्राथमिक शिक्षकांची ३० जूननंतर जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (कै. शिवाजीराव पाटील गट ) राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बदली पोर्टल सुरू करण्याबाबत मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांनी ही ग्वाही दिली.

बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या ऑनलाईन पद्धतीने करणेसाठी शासनाने दिनांक ७ एप्रिल २०२१ रोजी बदलीचे सुधारित धोरण जाहीर केले आहे. त्यासंदर्भातील सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.

बदली धोरणानुसार जिल्हा अंतर्गत बदल्या ३१ मेपर्यंत होणे बंधनकारक आहे. परंतु यावर्षी कोरोना संसर्गामुळे ३० जूनपर्यंत कोणत्याही प्रकारच्या बदल्या करू नयेत असे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे स्वतालुक्यात येऊ इच्छिणाऱ्या अनेक शिक्षकांची गैरसोय व निराशा झाली होती. परंतु आज रोजी कोरोना प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे.याच पार्श्वभूमीवर शिक्षक बदली पोर्टल सुरू करून प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत व आंतर जिल्हा बदली प्रक्रिया सुरू करावी. बदलीसाठीची सेवेची अंतिम तारीख ३१ मेऐवजी ३० जून करावी, संवर्ग ४ मध्ये समाविष्ट शिक्षकांना एका शाळेवर ३ वर्षे सेवा पूर्ण झाली असल्यास विनंती बदलीसाठी पात्र समजण्यात यावे. यासंदर्भात शासनाने लवकरात लवकर शुद्धिपत्रक काढावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (कै. शिवाजीराव पाटील गट) यांच्या वतीने करण्यात आली. याबाबत लवकरच शुद्धिपत्रक काढू असे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

बदलीसाठी धरावयाच्या सेवेची अंतिम तारीख ३१ मेऐवजी ३० जून केल्यास २०१८ व १९ मध्ये विस्थापित होऊन परतालुक्यात बदलून गेलेल्या शिक्षकांना स्वतालुक्यात येण्यासाठी लाभदायी ठरेल. एका शाळेवर तीन वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्वच संवर्गातील शिक्षकांना विनंती बदलीची संधी मिळावी.

केशवराव जाधव

सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

————————————————

फोटो ओळी :कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (कै. शिवाजीराव पाटील गट ) शिष्टमंडळाने बदली पोर्टल सुरू करण्याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले.

०८०६२०२१-बारामती-१५

————————————————

शिल्लक बातमी

बातमी फोटोसह आवश्यक

Web Title: Under the teachers' district in the state,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.