अर्थसंकल्पात अघोषित कपात
By Admin | Updated: June 9, 2014 05:01 IST2014-06-09T05:01:05+5:302014-06-09T05:01:05+5:30
महापालिकेच्या मागील वर्षाच्या अर्थसंकल्पात तब्बल १२५० कोटी रुपयांची तूट आली आहे. त्यातच पालिकेस मिळालेल्या उत्पन्नापेक्षाही सुमारे २५० कोटींचा जादा खर्च

अर्थसंकल्पात अघोषित कपात
पुणे : महापालिकेच्या मागील वर्षाच्या अर्थसंकल्पात तब्बल १२५० कोटी रुपयांची तूट आली आहे. त्यातच पालिकेस मिळालेल्या उत्पन्नापेक्षाही सुमारे २५० कोटींचा जादा खर्च झाल्याने या वर्षीच्या अर्थसंकल्पातील कामांमध्ये प्रशासनाकडून अघोषित कपात करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक विभागास सुमारे १० टक्के निधीच्या खर्चात कपात करण्यास सांगण्यात आले आहे.
पाणीपुरवठा, डे्रनेज, आरोग्य, पथ, विद्युत या विभागांकडून आपल्या कमी केलेल्या कामांची माहिती लेखापाल विभागास कळविण्यात
येत आहे.
महापालिकेचा २०१३-१४चा अर्थसंकल्प तब्बल ४ हजार १६८ कोटी रुपयांचा होता. मात्र, मार्च २०१४ अखेर महापालिकेस मिळालेले
उत्पन्न पाहता पालिकेस अवघे
२९०० कोटी रुपयेच मिळाले आहेत. तर, उत्पन्नाचा ताळमेळ न साधता प्रशासनाने सुमारे ३१५० कोटींचा खर्च केला आहे. त्यामुळे महापालिकेस चालू वर्षाच्या अर्थसंकल्पातून सुमारे २५० कोटी रुपयांची जादा बिले
द्यावी लागणार आहे.
त्यामुळे ज्या विभागांचा खर्च मान्यतेपेक्षा अधिक झाला. त्या विभागांकडूनच हा जादा निधी वसूल करण्यात येणार आहे.
(प्रतिनिधी)