मराठी लेखन नियमांबाबत अनिश्चितता
By Admin | Updated: August 30, 2016 00:59 IST2016-08-30T00:59:37+5:302016-08-30T00:59:37+5:30
भाषेचे काम हे वर्षानुवर्षे चालते. ती काही एका झटक्यात होणारी प्रक्रिया नाही, असे साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनीच ठणकावून सांगत महामंडळाने मराठी लेखनाचे सुधारित नियम करण्याचे हाती

मराठी लेखन नियमांबाबत अनिश्चितता
पुणे : भाषेचे काम हे वर्षानुवर्षे चालते. ती काही एका झटक्यात होणारी प्रक्रिया नाही, असे साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनीच ठणकावून सांगत महामंडळाने मराठी लेखनाचे सुधारित नियम करण्याचे हाती घेतलेले काम आठ वर्षांपासून भिजत पडले असल्याचे एकप्रकारे समर्थनच करून, पूर्णतेच्या कालावधीबाबतची अनिश्चितताच जणू स्पष्ट केली.
साहित्य महामंडळाने १९६२मध्ये मराठी भाषेबाबतचे नियम प्रसिद्ध केले होते जे आजही प्रचलित आहेत. परंतु महामंडळाच्या मराठीबाबतच्या नियमात अनेक त्रुटी व विसंगती असल्याने या संदर्भात अनेक तक्रारी व सूचना आल्या होत्या. प्रमाण मराठी कोणती, शुद्ध-अशुद्ध लेखन, प्रमाण मराठी कशी लिहावी व ती कशी बोलावी या विविध नियमांसाठी साहित्य महामंडळाचे कार्यालय मुंबई येथे असताना सात सदस्य समिती नेमली होती.
महामंडळाने या संदर्भात २००८मध्ये चार शहरांमध्ये चर्चासत्रे घेतली व त्यातून ही सात सदस्यीय समिती नेमण्यात आली. विविध सूचना या समितीने आपल्या अहवालातून केल्या. या समितीने यावर्षी मार्च महिन्यात साहित्य महामंडळाकडे अहवाल सुपूर्द केला. मात्र, त्याचवेळी महामंडळाच्या पुण्यातील कार्यालयाची मुदत संपत असल्याने त्यावर फार काम होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)