द्विलक्ष्यी प्रवेशाबाबत अनिश्चितता
By Admin | Updated: June 27, 2014 22:43 IST2014-06-27T22:43:20+5:302014-06-27T22:43:20+5:30
केंद्रीय प्रवेश समितीने यंदा प्रथमदाच द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया संस्था स्तरावर राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

द्विलक्ष्यी प्रवेशाबाबत अनिश्चितता
>पुणो : केंद्रीय प्रवेश समितीने यंदा प्रथमदाच द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया संस्था स्तरावर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी आधी विद्याथ्र्याना विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा लागेल. त्यानंतर त्याच महाविद्यालयात द्विलक्ष्यीला प्रवेश मिळेल; मात्र विज्ञान शाखा असलेल्या सर्वच महाविद्यालयांत ‘द्विलक्ष्यी’ विषय नसल्याने प्रवेशाबाबत अनिश्चिता आहे.
अकरावीसाठी केंद्रीय प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यापासून मागील वर्षीर्पयत द्विलक्ष्यी अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश याच प्रक्रियेतून टेबल पद्धतीने केले जात होते. मात्र, या वर्षी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असल्याने काही तांत्रिक अडचणींमुळे द्विलक्ष्यीला या प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. परिणामी, नियमित अकरावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर द्विलक्ष्यीचे प्रवेश निश्चित होणार आहेत. या वर्षी द्विलक्ष्यी अभ्यासक्रम हा 2क्क् गुणांचा एक विषय ग्राह्य धरण्यात आला आहे. द्विलक्ष्यीच्या एकूण 75 संस्थांमध्ये 6 हजार 1क्क् जागा उपलब्ध आहेत.
याबाबत माहिती देताना जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी राजेंद्र घुमे म्हणाले, ‘‘ज्या विद्याथ्र्याना विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला आहे, त्यांना त्याच महाविद्यालयात द्विलक्ष्यी विषयांसाठी अर्ज करावा लागेल. दोन्ही अभ्यासक्रम असलेली महाविद्यालये कमी आहेत. (प्रतिनिधी)
द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया संस्था स्तरावर राबविण्यात येणार असली, तरी गुणवत्ता व आरक्षणानुसार प्रवेश दिले जातील. विद्याथ्र्याना ज्या महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला आहे, तेथेच द्विलक्ष्यीसाठी अर्ज करायचा आहे. त्यानुसार संबंधित महाविद्यालायांची गुणवत्ता यादी वेळापत्रकानुसार प्रसिद्ध केली जाईल. प्रवेशाची गुणवत्ता यादी तसेच निवड यादी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाकडून प्रमाणित करून घ्यावी लागणार आहे. त्याशिवाय ती प्रसिध्द करता येणार नाही. त्यामुळे या विभागाचाही या प्रक्रियेवर अंकुश राहील.
- राजेंद्र घुमे
जिल्हा व्यवसाय शिक्षण
व प्रशिक्षण अधिकारी
द्विलक्ष्यी प्रवेशाचे वेळापत्रक
च्दि. 2 ते 16 जुलै : प्रवेशअर्ज स्वीकारण्याचा कालावधी
च्दि. 17 जुलै (दु. 12 वाजेर्पयत) : सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध
च्दि. 17 जुलै (दु. 12 ते सायंकाळी 5) : गुणवत्ता यादीवर आक्षेप स्वीकारणो
च्दि. 18 जुलै (दु. 12 वाजता) : अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध
च्दि. 18 ते 21 जुलै : प्रवेश निवड यादी जिल्हा व्यवसाय शिक्षण कार्यालयाकडून प्रमाणित करून घेणो
च्दि. 21 जुलै : प्रमाणित प्रवेश निवड यादी प्रसिद्ध करून प्रवेश देणो
च्दि. 31 जुलै : प्रवेश याद्या प्रमाणित करून घेणो
अकरावीची पहिली गुणवत्ता यादी आज
पुणो : अकरावीसाठी आपल्याला कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला, हे विद्याथ्र्याना आज (शनिवारी) समजणार आहे. सायंकाळी 6 वाजलेनंतर केंद्रीय प्रवेश समितीच्या संकेतस्थळावर गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. प्रवेशाबाबतची सर्व माहिती संकेतस्थळावरच मिळणार आहे. त्यानुसार पुढील प्रवेश घेता येईल. सुमारे 68 हजार विद्याथ्र्यानी अकरावी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत.
पुणो व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी यावर्षी प्रथमच ऑनलाईन पध्दत राबविण्यात येत आहे. त्यानुसार अर्ज करण्याची मुदत 23 जुनर्पयत होती. अंतिम मुदतीर्पयत सुमारे 68 हजार विद्याथ्र्यानी ऑनलाईन अर्ज केले आहेत. केंद्रीय प्रवेश समितीमार्फत शनिवारी या विद्याथ्र्याची पहिली गुणवत्ता यादी समितीच्या संकेतस्थळावर सायंकाळी 6 वाजता प्रसिध्द केली जाईल. त्यानुसार 3क् जुन ते 2 जुलैर्पयत विद्याथ्र्याना संबंधित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेता येईल. ही प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर 5 जुलै रोजी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
समितीच्या http://स्र4ल्ली.ा8Aू.1ॅ.्रल्ल या संकेतस्थळाच्या होमपेजवर ‘रिझल्ट टॅब’ ही लिंक उपलब्ध करून दिली जाईल. या ठिकाणी ‘लॉगीन आयडी’ टाकल्यानंतर विद्याथ्र्याना गुणवत्ता यादीनुसार प्रवेश मिळालेले महाविद्यालय, माध्यम तसेच संबंधित सर्व माहिती मिळू शकेल, अशी
माहिती शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांनी दिली.(प्रतिनिधी)