शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरात अनधिकृत 'टेरेस हॉटेल्स'चे पेव; महापालिकेचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 15:54 IST

महापालिकेची कुठलीही परवानगी नसताना सर्रास होतोय व्यावसायिक वापर 

पुणे : शहरामध्ये विशेषत: उपनगरांमध्ये व्यावसायिक इमारतींच्या टेरेसवर अनाधिकृतरित्या शेड टाकून व गार्डन लुक देऊन, ‘रूफ टॉप’ चा सर्रास वापर केला जात आहे़ याकरिता कुठल्याही प्रकारची महापालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी घेतली जात नसून, महापालिकेचेही या ‘रूफ टॉप’ वापराच्या नव्या पध्दतीकडे दुर्लक्ष झाले आहे.    व्यावसायिक इमारतीचा बांधकाम परवाना देताना इमारतीच्या टेरेसचा वापर सर्वांनाच करता येतो. पण या टेरेसवर अनाधिकृतरित्या शेड मारून हजारो स्वेअर फूट जागेत हॉटेल व रेस्टॉरंटचा व्यवसाय सुरू असल्याचे बहुतांशी व्यावासायिक इमारतींवर दिसून येत आहे. दोन-तीन मजल्यांच्या इमारतींपासून इतर उंच इमारतींच्या टेरेसचा वापर याकरिता होत आहे. विशेष म्हणजे हॉटेल व्यावसायिकांना इमारतीच्या शेवटच्या मजल्यावरील जागा भाडेतत्वावर देऊन, त्यांना टेरेसवर आपला व्यवसाय विस्तार करण्यास मोकळीक काही इमारत मालकांकडून दिली जात आहे़ अशावेळी इमारतीच्या शेवटचा मजला वापरताना टेरेसवर हॉटेल, रेस्टॉरंट, बार यांचा मोठा विस्तार केला जात असून, टेरेसच्या कठड्याला रंगीत दिवे असलेले अँगल लावणे, हिरवी नेट बांधणे तसेच पत्र्याचे शेड उभारणे, या माध्यमातून गार्डन लुक देऊन ओपन टेरेसवर मोठ-मोठ्या आवाजात लाऊड स्पिकरवर गाणी लाऊन, सर्रास मद्यविक्रीही केली जात आहे.------------- ‘रूफ टॉप’ वापरासाठी कोणीही घेतली नाही परवानगीनवीन बांधकाम नियमावलीत ‘रूफ टॉप’ वापर करताना, त्याच्या वापरापूर्वी टेरेसवर अत्यावश्यक सुरक्षा सोयी सुविधांसह टॉयलेट,बाथरूम असणे आवश्यक आहे. शहरात आजमितीला शेकडो व्यावसायिकांकडून ‘रूफ टॉप’चा वापर केला जात असला तरी, यापैकी एकानेही महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून परवानगी घेतल्याची नोंद नाही. --------------------टेरेसवरील अनाधिकृत हॉटेल्सवरील कारवाई थंडच     मुंबईमध्ये सुमारे दोन वर्षांपूर्वी ‘रूफ टॉप’ला आग लागल्याने, तेथील नागरिकांना एकच जीना असल्याने लागलीच उतरता न आल्याने मोठी दुर्घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने शहरातील अशा ‘रूफ टॉप’वर कारवाईही केली होती. परंतु, ही कारवाई थंड होताच विशेषत: लॉकडाऊनच्या काळात अनेक ठिकाणी टेरेसवर अनाधिकृत शेड टाकून त्यांचा आता व्यावासायिक वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे़.     पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून सध्या अनाधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे. परंतु या टेरेसवरील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात नाही.यामुळे या अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करून, ओपन टेरेस बार बंद करण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.--------------------------

टॅग्स :Puneपुणेhotelहॉटेलbusinessव्यवसायPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका