अनधिकृत फ्लेक्सच्या ‘टोल फ्री’ तक्रारी
By Admin | Updated: January 16, 2016 02:47 IST2016-01-16T02:47:58+5:302016-01-16T02:47:58+5:30
शहरामध्ये कुठेही अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, फलक लागले असल्यास त्याची तक्रार १८००२३३६६७९ या टोल फ्री क्रमांकावर करता येणार आहे. त्याचबरोबर ९६८९९३१५४६ या क्रमांकावर

अनधिकृत फ्लेक्सच्या ‘टोल फ्री’ तक्रारी
पुणे : शहरामध्ये कुठेही अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, फलक लागले असल्यास त्याची तक्रार १८००२३३६६७९ या टोल फ्री क्रमांकावर करता येणार आहे. त्याचबरोबर ९६८९९३१५४६ या क्रमांकावर एसएमएस पाठवूनही तक्रार नोंदविता येईल. या तक्रारीवर काय कारवाई करण्यात आली आहे, याचीही माहिती तक्रारदारांना मिळू शकणार आहे.
महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर कम्पलेन्ट या सदराखाली तक्रार नोंदविण्याची सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स, बॅनर यांचे फोटो देखील अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नागरिकांकडून टोल फ्री क्रमांक किंवा एसएमएस किंवा संकेतस्थळावरून तक्रार प्राप्त झाल्यास ती संबंधित विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठविली जाणार आहे.