अनधिकृत बांधकामे पाडली

By Admin | Updated: November 9, 2015 01:53 IST2015-11-09T01:53:10+5:302015-11-09T01:53:10+5:30

महापालिकेच्या वतीने कोथरूड-शास्त्रीनगर भागातील अनधिकृत बांधकामांवर बांधकाम नियंत्रण विभागाच्या आदेशानुसार अतिक्रमण निरीक्षकांच्या नेतृत्वाने कारवाई करण्यात आली

Unauthorized constructions were destroyed | अनधिकृत बांधकामे पाडली

अनधिकृत बांधकामे पाडली

कोथरूड : महापालिकेच्या वतीने कोथरूड-शास्त्रीनगर भागातील अनधिकृत बांधकामांवर बांधकाम नियंत्रण विभागाच्या आदेशानुसार अतिक्रमण निरीक्षकांच्या नेतृत्वाने कारवाई करण्यात आली. या वेळी शास्त्रीनगरच्या मध्यवस्तीत असलेल्या इमारतीचा भाग गॅसकटर अन् ब्रेकरच्या साह्याने पाडण्यात आला.
महापालिकेच्या वतीने या भागातील अनधिकृत बांधकामाला पूर्वीच नोटिसा देण्यात आल्या आहेत; परंतु व्यावसायिकांनी या बाबत खुलासा न केल्याने, ही कारवाई करण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या विरोधाची कल्पना घेऊन या कारवाईसाठी प्रचंड बंदोबस्त घेण्यात आला होता; परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून कारवाई थांबविण्यात आल्याचे अतिक्रमण निरीक्षक अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Unauthorized constructions were destroyed