शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या तोंडावर अनधिकृत बांधकामांचा धडाका

By admin | Updated: February 3, 2017 04:21 IST

उच्च न्यायालयाने ३१ मार्च २०१७नंतर शहरात अनाधिकृत बांधकामे होऊ नयेत, असे महापालिका प्रशासनाला सुनावले आहे. मात्र, न्यायालयाचे आदेश न जुमानता महापालिका

रहाटणी : उच्च न्यायालयाने ३१ मार्च २०१७नंतर शहरात अनाधिकृत बांधकामे होऊ नयेत, असे महापालिका प्रशासनाला सुनावले आहे. मात्र, न्यायालयाचे आदेश न जुमानता महापालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून शहरातील विविध भागांत युद्ध पातळीवर अनाधिकृत बांधकामांचा धडाका सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतदारांची व कार्यकर्त्यांची नाराजी नको म्हणून काही विद्यमान नगरसेवकांनी अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविली आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या कारवाई पथकाने अधिकृत बांधकामांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. शहरातील सुमारे अडीच लाख अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे गेल्या साडेचार वर्षांत बोटांवर मोजण्या इतकी अनाधिकृत बांधकाम व पत्राशेड उभारण्यात येत होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिका बांधकाम विभागाच्या कारवाई पथकाकडून तातडीने कारवाई केली जात होती. त्यामुळे अनधिकृत व धोकादायक बांधकामांना काही प्रमाणात चाप बसला होता. मात्र, महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांत अनधिकृत बांधकामाचे पेव फुटले आहे. जुनी बैठी घरे पाडून दुरुस्तीच्या नावाखाली मजल्यावर मजले चढविले जात आहेत. निवडणुकीच्या काळात कारवाई होणार नसल्याने ही बांधकामे बिनधास्तपणे दिवसरात्र सुरू आहेत. परिसरातील नागरिकांना या कामांचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील अनेक सोसायट्या व गल्ल्यांतील रस्त्यांवर वीट, वाळू व लोखंड पडलेले दिसून येत आहे. विशेष म्हणजे, स्थानिक पुढारी व कार्यकर्त्यांनी या बांधकामांचे ठेके घेतलेले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. अनधिकृत बांधकाम करीत असताना पालिका प्रशासनाकडून कारवाई टाळण्यासाठी अनेक मिळकतधारक महिनाभरात २ ते ३ मजल्यांची आरसीसीची कामे, बांधकाम, प्लॅस्टर, रंगरंगोटी घाई गडबडीत करीत आहेत. त्यामुळे शहरात अनधिकृत व धोकादायक बांधकामे होत आहेत. याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. (वार्ताहर)साहेब इकडे फिरकू नका ! साहेब मागील साडेचार वर्षे आम्ही तुमचे ऐकले; मात्र किमान सहा महिने तरी आमचे ऐका ! असे म्हणत अनेक नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना विनवणी करून अनधिकृत बांधकामांना अभय देण्याचे काम केले आहे. ‘आपल्या प्रभागात पालिकेचे अधिकारी येणार नाहीत, याची जबाबदारी माझी. बिनधास्त अनधिकृत बांधकामे करा. परंतु, लवकर काम करून घ्या. आम्ही अधिकाऱ्यांना सांभाळतो,’ असे म्हणत अनधिकृत बांधकामांना पाठबळ देण्याचे काम नगरसेवकांनी सुरू ठेवले आहे. त्यामुळे शहरात बांधकाम निरीक्षक व कनिष्ठ अभियंता कुठेही फिरताना, नोटीस देताना व कारवाई करताना दिसत नाही. केवळ अनधिकृत बांधकामांच्या नोंदी करून संबंधितांना भेटण्यासाठी बोलावत आहेत. परंतु, भविष्यात अनधिकृत बांधकामांची शास्ती व दंडाचा परिणाम संबंधित मिळकतधारकांना भोगावा लागणार आहे. शिवाय, अनधिकृत बांधकामांमुळे शहराच्या विद्रूपीकरणात भर पडत आहे.उपनगरांत अनधिकृतचे पेव...शहरातील प्रमुख्याने रहाटणी, काळेवाडी, पिंपळे गुरव, सांगवी, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, ताथवडे, रावेत, चिंचवड, पिंपरी, चिखली, शाहूनगर, भोसरी थेरगाव, किवळे यासह शहरातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामाचे पेव फुटले आहे. तरी महापालिकेचे संबंधित विभाग याकडे डोळे झाक करीत आहेत. त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी व नगरसेवकांचा दबाव असल्याची चर्चा आहे. लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद ३१ मार्च २०१२ ते ३१ नोव्हेंबर २०१६ पर्यंत महापालिका हद्दीतील विविध प्रकारच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे सत्र सुरु होते. या काळात प्रशासनाने मिळकतधारकांना नोटीस बजावली आहे. बांधकाम करणाऱ्यांवर गुन्हे नोंदविले होते. मात्र, दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू झाली आहेत. त्यामधील बहुतेक कामे ही स्थानिक लोकप्रतिनिधी व नगरसेवकांच्या आशीर्वादाने सुरू आहेत.