अनधिकृत जाहिरातबाजीच्या हेल्पलाइनचे वाजले बारा
By Admin | Updated: November 9, 2014 01:06 IST2014-11-09T01:06:45+5:302014-11-09T01:06:45+5:30
शहरातील चमकोगीरी करणा:या माननीयांच्या, तसेच त्यांच्या कार्यकत्र्याच्या अनधिकृत जाहिरातबाजीची माहिती नागरिकांनी महापालिकेस कळवावी,

अनधिकृत जाहिरातबाजीच्या हेल्पलाइनचे वाजले बारा
पुणो : शहरातील चमकोगीरी करणा:या माननीयांच्या, तसेच त्यांच्या कार्यकत्र्याच्या अनधिकृत जाहिरातबाजीची माहिती नागरिकांनी महापालिकेस कळवावी, या उद्देशाने आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने सुरू केलेल्या हेल्पलाइनवर अवघ्या 12 तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे एरवी या जाहिरातीमुळे आकाशपातळ एक करणारे पुणोकर आता हेल्पलाइन बाबत उदासीन असल्याचे चित्र आहे.
शहराच्या प्रत्येक गल्लीबोळात, तसेच प्रमुख चौकांमध्ये प्रामुख्याने राजकीय नेत्यांच्या जाहिरातबाजीला उधाण आलेले असते, या नेत्यांचे चाहते आणि कार्यकर्ते जागा मिळेल तिथे फ्लेक्स, बोर्ड, बॅनर्स पोस्टर लावतात, त्यामुळे मोठय़ा प्रमाणात शहराचे विद्रूपीकरण होते.
या जाहिरातींचे प्रमाण एवढे मोठे आहे, की आकाशचिन्ह विभागाने गेल्या वर्षभरात तब्बल दीड लाखाहून अधिक फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर काढलेले आहेत. मात्र, त्यानंतरही पुन्हा पुन्हा ही जाहिरातीची चमकोगीरी सुरूच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनाही याबाबत महापालिका प्रशासनास माहिती कळवावी, या उद्देशाने महापालिकेने तीन आठवडय़ांपूर्वी हेल्पलाइन सेवा सुरू केली होती. या हेल्पलाइनवर नागरिकांनी फोन करून, एसएमएसद्वारे, तसेच ई-मेलद्वारे तक्रारी कराव्यात, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार, संबंधित जाहिरातदारावर शहर विद्रूपीकरणांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार होते.
(प्रतिनिधी)
हेल्पलाइनवर अवघ्या 12 तक्रारी
या हेल्पलाइनवर पुणोकरांकडून मोठय़ा प्रमाणात तक्रारी येण्याची शक्यता गृहीत धरून महापालिकेने त्यानुसार तक्रारींचे निराकारण करण्यासाठी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तयारीही करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात फोन क्रमांकावर चारच तक्रारी आल्या, तर एसएमएसद्वारे चार आणि ई-मेलद्वारेही चारच तक्रारी आल्याचे आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे प्रमुख उपायुक्त विजय दहिभाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
तक्रारीचा पुणोरी झटका
हेल्पलाइनवर एका चोखंदळ पुणोकराने एसएमएसद्वारे केलेल्या तक्रारीतून आकाशचिन्ह विभागाचे चांगलेच कान टोचत पुणोरी झटका दिला आहे. या तक्रारीत ‘उगाच आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडू नका, जरा डोळे उघडे ठेवून काम करा, सर्व काही दिसेल, त्यासाठी आम्हाला कशाला त्रस देता,’ अशा शब्दांत आकाशचिन्ह विभागाला आपल्या कामाची जाणीव करून दिली आहे.