- कल्याणराव आवताडे- पुणे : उंची सात फूट, वजन १४५ किलो, बुटाचा साईज १७ नंबर, वय ३७ वर्षे आणि एकावेळी १ किलो मटण फस्त करणारा असा आगळावेगळा माणूस ' महाराष्ट्राचा खली ' म्हणून परिचित आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचा हा कलाकार राजकीय व सिनेक्षेत्रात आकर्षणाचा विषय होत आहे. पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथील असणारा उमेश रमेश वसवे यांनी शाळेत असतानाच तलवारबाजी स्पर्धेत भाग घेतला होता. त्यातून जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, व राष्ट्रीय पातळीवर तलवारबाजीत विशेष प्राविण्य मिळवत राज्यस्तरावर ३० तर राष्ट्रीय स्तरावर ९ पदके मिळविली. महाराष्ट्राचा खली, महाराष्ट्राचा हिमालय, प्राईड ऑफ महाराष्ट्र असे अनेक पुरस्कारही देऊन अनेक संस्थांनी त्यांचा सन्मान केला आहे.
अमेरिकेमधून मागवावे लागतात बूट .. लहानपणापासून उमेश यांना खेळाची आवड होती, त्यांना लागणाºया सतरा नंबरचा बूट व चपला भारतात उपलब्ध होत नसल्याने त्या अमेरिकेतून मागवाव्या लागतात. वापरासाठी लागणारे कपडेही शिवूनच घयावे लागतात, सर्वसामान्य माणसाला लागणाºया कापडापेक्षा त्यांना दुप्पट कापड लागते. तसेच त्यांच्या डोक्याच्या मापाचे हेल्मेटही बाजारात मिळत नाहीत.
खºया खलीनेही केले महाराष्ट्राच्या खलीचे कौतुक कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा कार्यक्रमात उमेश वसवे यांनी खºया खलीला भेटायची इच्छा व्यक्त केल्यांनतर खलीने त्यांना आपल्या घरी बोलावून त्यांचा 'महाराष्ट्राचा खली' म्हणून कौतुकसुद्धा केले. काही काळ सेलेब्रिटींसाठी बाउन्सर म्हणून काम करताना काही सेलेब्रिटींनीच महाराष्ट्राच्या या खलीसोबत सेल्फी काढले आहेत.
१. खºया खलीसोबत उमेश वसवे २. कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा या कार्यक्रमातही सहभागी